अगदी स्नॅपचॅटच्या फेस स्वॅपवरूनही वादंग उठले. असेच काही ‘भावना दुखावणारे’ उदाहरणे तुमच्यासमोर मांडत आहोत ज्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याची उघड उघड गळचेपी करण्यात आली.
१. उडता पंजाब
आगामी काळात सेन्सॉर बोर्डाच्या मनमानी कारभाराचे आदर्श उदाहरण म्हणून ‘उडता पंजाब’चे नाव घेतले जाईल. बॉक्स आॅफिसवर फारशी कमाल करू न शकलेला हा चित्रपट बातम्यांमध्ये प्रचंड हीट ठरला. सेन्सॉर बोर्डाने चित्रपटात ९४ कटस् सुचवून कहरच केला. पंजाब राज्य सरकारनेसुद्धा राज्याची चुकीचा प्रतिमा दाखवल्याचे कारण समोर करीत चित्रपटातून पंजाब हा शब्द काढून टाकण्यास सांगितले.
याविषयी आणखी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
२. तन्मय भटचे स्नॅपचॅट पोस्ट
‘एआयबी’चा विनोदवीर तन्मय भट ‘वाईल्ड जोक्स’साठी ओळखला जातो. रणवीर सिंग आणि अर्जुन कपूरचे ‘रोस्ट’ आयोजित करून जेलमध्ये जाण्यापासून थोडक्यात वाचलेल्या तन्मयने स्नॅपचॅटचे ‘फेस स्वॅप’ वापरून लता मंगेशकर व सचित तेंडुलकर या भारतरत्न विजेत्यांवर विनोद केला; परंतु त्याचा ‘सेन्स आॅफ ह्युमर’ काही लोकांना पटला नाही. शिवीगाळापासून ते मारहाणीच्या धमक्यांपर्यंत सर्व काही त्याला सहन करावे लागले.
आणखी वाचा :
तन्मयविरुद्धच्या वक्तव्याने सोनमला धक्का
तन्मय भटवर आशा भोसले कडाडल्या
३. अलिगढमध्ये ‘अलिगढ’ बॅन
चित्रपटांवर नैतिकतेच्या रक्षकांचा विशेष डोळा असतो. मोठ्या पडद्यावर काही तरी हटके करायला गेले की, त्यांच्या नजरा टवकारल्या जातात. याचा फटका मनोज वाजपेयी अभिनित ‘अलिगढ’ या चांगल्या चित्रपटाला बसला. समलैंगिकतेविषयी कमालीचा द्वेष बाळगणाऱ्या समाजात ‘अलिगढ’सारखा समलैंगिक प्राध्यापकाची गोष्ट सांगणारा चित्रपट सहजासहजी थोडाच शांततेत रिलीज होऊ शकेल. ही सत्यकथा ज्या शहरात घडली त्या अलिगढ शहरातच हा सिनेमा बॅन करण्यात आला
४. कॉमेडीतून ट्रॅजेडीकडे
क पिल शर्माच्या शोद्वारे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या टीव्ही कॉमेडियन किकू शरदालासुद्धा लोकांना हसवणे रडवणारे ठरले. ‘स्वयंघोषित संत’ गुरमीत राम रहिम सिंग यांच्यासारखी वेशभूषा करून मिमिक्री केल्याने त्या जेलची हवा खावी लागली. त्याने माफी मागितल्यानंतर या प्रकरणावर पडदा टाकण्यात अला.
५. साला क्यों बोला?
प्रियांका चोप्रा ‘जय गंगाजल’मध्ये पोलिस बनून गुन्हेगार व भ्रष्ट नेत्यांना धडा शिकवायला निघाली पण सेन्सॉर बोर्डाने तिलाच संस्कारी भाषेचा पाठ शिकवला. ‘गंगाजल’चा रिमेक असणाऱ्या या प्रकाश झा दिग्दर्शित सिनेमातून ‘साला’ हा शब्द काढून टाकावा अशी सेन्सॉरने सूचना केली होती.
६. ऐ दिलची मुश्किल
करण जोहरने कधी स्वप्नातही विचार केला नसेल की, त्याच्या लव्ह स्टोरी फिल्मला एवढा तिरस्कारायुक्त अग्निदिव्यातून जावे लागेल. ‘मनसे’ची धमकी पुरेशी नव्हती म्हणून सेन्सॉरनेसुद्धा त्याला छळवण्याचे ठरवले. ऐश्वार्या रायचे वय पाहता तिचे इंटिमेट सीन्स लोकांना दाखवणे योग्य नाही असा विचार करून सेन्सॉरने ‘उम्र में बडी हैं, एक्सपेरियन्स भी कमाल का है’ यासारखे संवाद कापले.
७. डेडपूल झाला संस्कारी
भारतीय चित्रपटांच्या अभिव्यक्तीचा गळा घोटल्यानंतर विदेशी सिनेमांकडे सेन्सॉरने मोर्चा वळवला. ‘डेडपूल’सारख्या प्रौढ सिनेमातून शिव्या आणि शर्टलेस सीन वगळल्यानंतरच तो रिलीज होऊ दिला. प्रेक्षकांच्या मनावर पाश्चिमात्य संस्कृतिचा वाईट प्रभाव पडू नये याची पुरेपुर काळजी घेण्यात आली.