Join us

Forbes 30 under 30 list : ​आलिया, श्रद्धाला पछाडत भूमी पेडणेकरने मारली बाजी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2018 12:10 IST

‘फोर्ब्स’ या नामांकित मॅगझिनने आपआपल्या क्षेत्रात प्रशंसनीय कार्य करणा-या ३० भारतीय युवकांची Forbes 30 under 30 यादी जाहिर केली ...

‘फोर्ब्स’ या नामांकित मॅगझिनने आपआपल्या क्षेत्रात प्रशंसनीय कार्य करणा-या ३० भारतीय युवकांची Forbes 30 under 30 यादी जाहिर केली आहे.  या यादीत मनोरंजन, कला, अभियांत्रिकी, शिक्षण आदी क्षेत्रांतील युवकांचा समावेश करण्यात आला आहे. मनोरंजन विश्वातील तीन सेलिब्रिटींनी या यादीत स्थान मिळवले आहे. हे तीन सेलिब्रिटी कोण, तर अभिनेत्री भूमी पेडनेकर, अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री मिथिला पालकर. होय, ३० च्या आतील अनेकांशी या स्पर्धा करून या तिघांनी बाजी मारली आहे.भूमी पेडणेकर, वय २८ वर्षेभूमी पेडणेकर हिने फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘दम लगा के हईशा’ या पहिल्याच चित्रपटात तिने जाड महिलेची भूमिका साकारून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. या चित्रपटातील भूमीच्या अभिनयाची जोरदार प्रशंसा झाली. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी यश राज बॅनरमध्ये ती सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होती. यानंतर भूमीने यशराजसोबत तीन चित्रपट साईन केलेत.मिथिला पालकर, वय २४ वर्षेयु-ट्यूबच्या जगात मिथिला पालकर एक मोठे नाव आहे.  इमरान खान व कंगना राणौतच्या ‘कट्टी बट्टी’ या चित्रपटात ती एक छोटीशी भूमिका साकारताना दिसली होती. आता मिथिला इरफान खान व दलकीर सलमानसोबत ‘कारवां’मध्ये दिसणार आहे.विकी कौशल, वय २९ वर्षे ALSO READ : भूमी पेडणेकरने केले मान्य; म्हटले, ‘माझे बऱ्याचशा तरुणांशी होते अफेअर’!!विकी कौशल याला ‘मसान’ या चित्रपटासाठी ओळखले जाते. या  चित्रपटातील विकीच्या भूमिकेला समीक्षकांनी मोठी दाद दिली होती. २०१० मध्ये विकीने अनुराग कश्यपच्या ‘गँग आॅफ वासेपूर’ या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिले होते.  यानंतर ‘जुबान’, ‘रमन राघव 2.0’मध्ये विकी दिसला होता. लवकरच विकी आलिया भट्टसोबत ‘राजी’ या चित्रपटात दिसणार आहे.