Join us

'तुम बिन'मधील या अभिनेत्याचा लेटेस्ट फोटो पाहून हैराण झाले चाहते, ओळखणं झालंय कठीण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 16:46 IST

1 / 8
२००१ मध्ये प्रदर्शित झालेला सुपरडुपर हिट चित्रपट 'तुम बिन' तुम्हाला आठवत असेल. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला.
2 / 8
आजही हा चित्रपट सर्वोत्कृष्ट रोमँटिक चित्रपटांच्या यादीत समाविष्ट आहे. या चित्रपटात संदली सिन्हा, हिमांशू मलिक, राकेश बापट आणि प्रियांशू चॅटर्जी मुख्य भूमिकेत दिसले होते.
3 / 8
'तुम बिन' चित्रपट प्रदर्शित होऊन २० वर्षे उलटून गेली आहेत आणि या अनेक वर्षांत चित्रपटातील कलाकारांचा लूकही खूप बदलला आहे. या चित्रपटात प्रियांशू चॅटर्जीने 'शेखर मल्होत्रा'ची भूमिका साकारली होती, जी लोकांना खूप आवडली होती.
4 / 8
प्रियांशू चॅटर्जीचा साधेपणा आणि त्याच्या चेहऱ्यावरचा निरागसपणा लोकांना आवडतो. सध्या सोशल मीडियावर या अभिनेत्याचा एक फोटो समोर आला आहे, जो पाहिल्यानंतर लोक विचारू लागले आहेत की हा तोच अभिनेता आहे का?
5 / 8
प्रियांशू सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि त्याचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो खांद्यापर्यंत केस आणि दाढी वाढलेली दिसत आहे.
6 / 8
अभिनेत्याचा हा लूक पाहिल्यानंतर तुम बिनच्या या क्यूट हिरोला लोक ओळखू शकत नाहीत. मात्र, अभिनेत्याचा हा लूक त्याच्या आगामी प्रोजेक्टसाठी आहे.
7 / 8
प्रियांशूच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर तो काही निवडक चित्रपटांमध्ये दिसला आहे. 'तुम बिन'मधून त्याला खूप लोकप्रियता मिळाली.
8 / 8
तुम बिन व्यतिरिक्त आपको पहले भी कहीं देखा है, दिल का रिश्ता, कोई मेरे दिल में है आणि भूतनाथ यांसारख्या चित्रपटांमध्येही दिसला आहे.