विराट-अनुष्काच्या या साखरपुड्यात सहभागी होण्यासाठी अंबानी कुटुंबीयांकडून खास व्यवस्था करण्यात आली. मुंबईहून देहरादूनला पोहचण्यासाठी अंबानी कुटुंबीयांकडून एका चार्टर प्लेनचे बुकिंग करण्यात आले होते. सगळ्या गोष्टी अंबानी कुटुंबीय करत असे वाटत असले तरी पडद्यामागून अंबानी कुटुंबीतील एक व्यक्ती या सोहळ्यासाठी विशेष मेहनत घेत होती. चार्टर प्लेनच्या बुकिंगपासून इतर सगळ्या गोष्टींवर अंबानी कुटुंबातील एक सदस्याची बारीक नजर होती. हा सदस्य म्हणजे आकाश अंबानी. आकाशनेच देहरादूनसाठी चार्टर प्लेनचे बुकिंग केले. शिवाय इतर गोष्टींचीही व्यवस्था आकाशनेच केल्याचे बोलले जात आहे. बच्चन कुटुंबीय आणि अंबानी कुटुंबीय हे विराट आणि अनुष्काच्या साखपुड्यासाठी देहरादूनच्या आनंदा हॉटेलमध्ये थांबले आहेत.या साखरपुड्याची जोरदार तयारीही सुरू झालीय. मुळात आनंदा हॉटेल हे टिहरी राजघराण्याचा महल म्हणून प्रसिद्ध आहे. इतकेच नाहीतर या सोहळ्याची छोट्यातली छोटी बातमीही बाहेर येऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. हॉटेलमधील कर्मचा-यांनाही त्यांचे मोबाईल फोन स्विच ऑफ ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
विराट आणि अनुष्काच्या अफेअरबद्दल कायमच उलटसुलट चर्चा रंगल्या. दोघांनाही त्यांच्या रिलेशनशिपविषयी, लग्नाविषयी प्रश्न विचारले जात होते. मात्र प्रत्येकवेळी या लव्हबर्ड्सकडून त्यांच्या लग्नाच्या बातम्यांचा इन्कार करण्यात आला. अखेर आता लवकरच इतरांप्रमाणे लग्नबंधनात अडकण्याचा विराट आणि अनुष्काने विचार केला आहे. त्या अनुषंगाने आता नववर्षाच्या मुहूर्तावर दोघांचा साखरपुडा होणार आहे. विराट-अनुष्काच्या कुटुंबासाठी हा क्षण सर्वोच्च आनंदाचा असणार हे मात्र नक्की