'इंग्लिश विंग्लिश'मधली छोटी मुलगी आता दिसते सुंदर; अभिनेत्रीचं अरेंज मॅरेज ठरलं; म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 11:32 IST
1 / 9२०१२ साली आलेला इंग्लीश विंग्लीश आठवतोय? सिनेमाची कथा प्रेक्षकांना खूपच भावली होती. तसंच अभिनेत्री श्रीदेवीच्या अभिनयाचंही खूप कौतुक झालं होतं.2 / 9सिनेमात श्रीदेवीला एक मुलगा आणि एक मुलगी असतात. यातील मुलीची भूमिका बालकलाकार नविका कोटियाने केली होती. आता नविका मोठी झाली आहे. इतकंच नाही तर तिने नुकतीच प्रेमाची कबुलीही दिली आहे.3 / 9नविका कोटिया इन्स्टाग्रामवर अॅक्टिव्ह आहे. ती आता आणखी सुंदर दिसत आहे. तिच्या सौंदर्यावर चाहतेही फिदा झाले आहेत. नविकाचे इन्स्टाग्रामवर ६ लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.4 / 9नविकाने एका मुलाखतीत लग्नाची बातमी कन्फर्म केली. ती म्हणाली,'जानेवारी महिन्यातच आमचा रोका झाला. नुकतीच गुड धाना हा एक विधी झाला आणि लग्न पक्क झालं. पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये आम्ही साखरपुडा करु. पण लग्नाची तारीख अजून निश्चित केलेली नाहीय5 / 9'आमचं अरेंज मॅरेज सारखंच आहे. एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून आम्ही भेटलो. मग एक वर्ष आम्ही मित्रच होतो. यावर्षी दिवाळीत त्याच्या आईने माझ्या आईला फोन करुन लग्नासाठी मागणी घातली.'6 / 9'मला नेहमीच अरेंज मॅरेजच करायचं होतं म्हणून मी खूश आहे. हा पण हे सगळं इतकं लवकर होईल असं वाटलं नव्हतं. गोष्टी खूप पटापट घडल्या पण मी खरंच आभारी आहे मला खूप चांगला जोडीदार मिळाला.'7 / 9नविकाच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव माजेन मोदी आहे. तो रिअल इस्टेट डेव्हलपर आणि बिझनेसमन आहे. त्याला कार रेसिंगची आवड आहे. 8 / 9तर नविका 'स्कुल फ्रेंड्स' वेबसीरिजमध्ये दिसली होती. तसंच तिने 'क्यूँकी सांस मां बहू बेटी होती है' मालिकेतही तिने काम केलं होतं. 9 / 9विशेष म्हणजे इंग्लीश विंग्लिशमध्ये नविकाच्या भावाची भूमिका साकारणारा शिवांश हा तिचा खरा भाऊ आहे. तोही आता मोठा झाला आहे. भावाबहिणींचे रील्स सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.