कामाच्या तणावामुळे पीसी झाली अशक्त!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2016 22:00 IST
‘बाजीराव मस्तानी’,‘क्वांटिको’ आणि ‘जय गंगाजल’ या प्रोजेक्ट्समुळे प्रियंका चोप्राला अशक्त झाल्यासारखे वाटते आहे. प्रमोशन्स, आॅस्कर आणि शूटिंग यांच्यामुळे तिच्या ...
कामाच्या तणावामुळे पीसी झाली अशक्त!
‘बाजीराव मस्तानी’,‘क्वांटिको’ आणि ‘जय गंगाजल’ या प्रोजेक्ट्समुळे प्रियंका चोप्राला अशक्त झाल्यासारखे वाटते आहे. प्रमोशन्स, आॅस्कर आणि शूटिंग यांच्यामुळे तिच्या शरीरातील पाणी कमी झाल्याने तिला अशक्तपणा जाणवत होता. त्यानंतर तिला आयव्ही (इंट्राव्हेनस फ्लड्स) देण्यात आले. पण, त्यामुळे तिने स्वत:ला मागे ओढले नाही. तर त्यातही ती भक्कमपणे उभीच होती. ‘जय गंगाजल’ चित्रपटाची टीम तिच्या समर्पण वृत्तीने सुखावली होती. दिग्दर्शक आणि लेखक या चित्रपटाची गेल्या सहा वर्षापासून वाट पाहत होते. त्यामुळे झा म्हणाले,‘ मला शंकाच होती की, पीसी क्वांटिको, बाजीराव मस्तानी आणि माझ्या चित्रपटादरम्यान स्वत:ला कसे मॅनेज करू शकेल? पण नाही तिने ते करून दाखवले. मी जेव्हा तिच्यासोबत चित्रपटाच्या कथेविषयी बोललो. तेव्हा ती म्हणाली,‘ मीच आहे तुमची आभा माथूर. मी करेन. आणि तिने १०० टक्के कामाला वाहून घेतले.’