Join us

श्रद्धा-सिद्धांतची ‘द ड्रामा कंपनी’ शोवर धम्माल-मस्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:16 IST

‘हसीना पारकर’ या बायोपिक आधारित चित्रपटात श्रद्धा कपूर आणि सिद्धांत कपूर यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाची टीम अलीकडेच प्रमोशनसाठी ‘द ड्रामा कंपनी’ या कॉमेडी शोमध्ये आले होती. या शोवर सर्वांनी मिळून मस्त धम्माल केली.

‘हसीना पारकर’ या बायोपिक आधारित चित्रपटात श्रद्धा कपूर आणि सिद्धांत कपूर यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाची टीम अलीकडेच प्रमोशनसाठी ‘द ड्रामा कंपनी’ या कॉमेडी शोमध्ये आले होती. या शोवर सर्वांनी मिळून मस्त धम्माल केली.सिद्धांत कपूर आणि श्रद्धा कपूर यांनी अशी कूल पोझ या कार्यक्रमाच्या सेटवर दिली.सेटवर मिथून चक्रवर्ती आणि श्रद्धा कपूर यांनी मिळून फोटोग्राफर्सना अशी पोझ दिली.सिद्धांत कपूर आणि द ड्रामा कंपनीची टीम यांनी सेटवर उभारलेल्या या अलिशान स्टेजवर धम्माल डान्स केला.मिथून चक्रवर्ती, श्रद्धा कपूर आणि सिद्धांत कपूर हे एकत्र मिळून कॉमेडी शोचा आनंद लुटत होते.डान्स करता करता कॉमेडियन कृष्णा याने सिद्धांत कपूरला असे उचलून घेतले.श्रद्धा कपूर आणि सिद्धांत कपूर हे दोघे खऱ्या आयुष्यात बहीण-भाऊ आहेत. रक्षाबंधनाचा सण जवळ येत असल्याने सेटवर श्रद्धाने सिद्धांतला राखी बांधून सण साजरा केला.श्रद्धा कपूरने अशा स्टायलिश अंदाजात या सेटवर उपस्थिती नोंदवली.सिद्धांत कपूर हा अशा रॉयल लूकमध्ये द ड्रामा कंपनी सेटवर आला होता.द ड्रामा कंपनीचा शो संपण्यापूर्वी मिथूनदा, श्रद्धा, कृष्णा आणि इतरांनी अशी धम्माल मस्ती केली.