Join us
Daily Top 2Weekly Top 5

सलमान खानच्या 'हम आपके है कौन'मधली रिटा आठवते का?, आता तिला ओळखणं झालंय कठीण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2024 19:59 IST

1 / 8
'हम आपके है कौन' मधली रिटा आठवते का? चित्रपटात रिटा सलमान खानच्या प्रेम या व्यक्तिरेखेला प्रभावित करण्याचा खूप प्रयत्न करते. रिटाची भूमिका अभिनेत्री साहिला चड्ढा हिने साकारली होती. हा चित्रपट प्रदर्शित होऊन ३० वर्षे झाली आहेत आणि साहिला चड्ढा हिने अभिनय सोडून जवळपास १६ वर्षे झाली आहेत.
2 / 8
साहिला चड्ढा सध्या कुठे आणि काय करतेय हे तुम्हाला माहिती आहे का? साहिलाने एका अभिनेत्याशी लग्न केले होते आणि ती संजय दत्तची मेहुणी लागते. ती आता पूर्णपणे बदलली आहे. तिचे लेटेस्ट फोटो पाहिल्यास तुम्हाला धक्का बसेल. तिला ओळखतादेखील येणार नाही.
3 / 8
साहिला चड्ढा यांनी वयाच्या १० व्या वर्षी काम करायला सुरुवात केली. ती मिस इंडियाही राहिली आहे. मिस इंडिया होण्यापूर्वी साहिला चड्ढाने सुमारे २५ सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेतला होता.
4 / 8
मिस इंडिया झाल्यानंतर साहिला चड्ढा यांनी १९८५ मध्ये चित्रपटांमध्ये प्रवेश केला. सुरुवातीला त्यांनी छोटे चित्रपट आणि भूमिका केल्या. त्यांनी सुरुवातीला कन्नड ते तमिळ आणि अगदी भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केले.
5 / 8
साहिला चड्ढा जवळपास दशकभर चित्रपटांमध्ये संघर्ष करत राहिली. 'बोल राधा बोल', 'चांद का तुकडा', 'दौलत की जंग' आणि 'मा' यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने छोट्या भूमिका केल्या. पण 'हम आपके है कौन'मध्ये साकारलेल्या रिटाच्या भूमिकेने तिला प्रसिद्धी मिळवून दिली. ही भूमिकाही छोटी होती, पण ३० वर्षांनंतरही लोकांना या पात्राच्या नावानेच साहिला चड्ढा आठवते.
6 / 8
याशिवाय साहिलाचा स्वतःचा रेस्टॉरंट व्यवसाय आणि स्टुडिओ आहे. तिने स्वतःला वेडिंग प्लॅनर आणि इंटिरियर डिझायनर देखील आहे. तिचा प्रॉपर्टी डीलिंगचाही व्यवसाय आहे.
7 / 8
साहिला चढ्ढा यांनी प्रसिद्ध अभिनेता निमाई बाली यांच्याशी विवाह केला, जो संजय दत्तच्या मावशीचा मुलगा आहे. यामुळे साहिला ही संजय दत्तची वहिनी झाली. निमाई बाली आणि साहिला चड्ढा यांनाही एक मुलगी आहे.
8 / 8
साहिला चड्ढाही वादात राहिली. काही वर्षांपूर्वी तिने पतीवर मारहाणीचा आरोप केला होता. त्यानंतर निमाई बाली वैतागून घरातून निघून गेला. रिपोर्ट्सनुसार, साहिलाने तर निमाईने तिच्या मुलीला मारण्याचा प्रयत्न केला होता, असेही सांगितले होते.
टॅग्स :सलमान खान