'तेरे नाम'मधली निर्झलाची मैत्रिण आठवतेय का? सध्या आहे इंडस्ट्रीतून गायब, २२ वर्षांनंतर आता दिसते अशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 18:22 IST
1 / 8२००३ साली प्रदर्शित झालेला सलमान खानचा 'तेरे नाम' हा चित्रपट हिंदी सिनेसृष्टीतील एक कल्ट क्लासिक मानला जातो. या चित्रपटातील कथेला आणि कलाकारांना प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले. 2 / 8'तेरे नाम' सिनेमात भूमिका चावलाने 'निर्झला'ची मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटात 'निर्झला'च्या मैत्रिणीची, म्हणजेच 'इंदू'ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.3 / 8या चित्रपटात इंदूची भूमिका अभिनेत्री इंदू शर्माने साकारली होती. आज ही अभिनेत्री प्रसिद्धीच्या झोतातून दूर गेली आहे. 4 / 8एकेकाळी छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध चेहरा असलेल्या इंदूने २००३ साली 'झी टीव्ही'वरील लोकप्रिय मालिका 'आवाज... दिल से दिल तक' मध्ये काम केले होते. 5 / 8याव्यतिरिक्त, ती 'स्टार प्लस'वरील 'एक हजारों में मेरी बहना है' यांसारख्या अनेक गाजलेल्या मालिकांमध्येही दिसली आहे.6 / 8सध्या इंदू शर्माचे नाव आणि ओळख लोकांच्या स्मृतीतून पुसली गेली आहे. अभिनेत्री म्हणून ती शेवटची 'रिहा' नावाच्या यूट्यूब शॉर्ट फिल्ममध्ये दिसली होती, ज्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरही खूप प्रशंसा मिळाली होती.7 / 8'तेरे नाम' व्यतिरिक्त इंदूने संजय दत्तच्या 'हथियार' यांसारख्या इतरही काही चित्रपटांमध्ये काम केले आहे. विशेष म्हणजे, इंदू शर्मा एक प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर म्हणूनही काम करते. 8 / 8तिने अक्षय कुमारच्या 'द शौकीन', 'शिकारा', 'हॉस्टेजेस', 'तेरे बिन लादेन' आणि 'ओह माय गॉड २' यांसारख्या चित्रपटांसाठी कलाकारांची निवड केली आहे.