Join us
Daily Top 2Weekly Top 5

'कभी हाँ कभी ना'ची 'अ‍ॅना' आठवतेय का?, आताही दिसते तितकीच सुंदर, पाहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 16:06 IST

1 / 9
१९९४ मध्ये रिलीज झालेल्या 'कभी हाँ कभी ना' चित्रपटातील अ‍ॅना ऊर्फ सुचित्रा कृष्णमूर्ती ला चांगलीच लोकप्रियता मिळाली.
2 / 9
सुचित्रा केवळ अभिनेत्री आणि मॉडेल नव्हती, तर तिने गायनाच्या दुनियेतही स्वतःची छाप सोडली. हिंदी आणि साऊथ चित्रपटसृष्टीमध्ये काम करण्यासोबतच तिने टीव्ही शोमध्येही काम केले आहे.
3 / 9
हिंदी चित्रपटसृष्टीत सुचित्राने शाहरुख खानच्या 'कभी हाँ कभी ना' चित्रपटातून पदार्पण केले. चित्रपटातील तिचे 'अ‍ॅना' हे पात्र प्रेक्षकांना खूप आवडले होते. तिच्या सौंदर्याचे, निरागसतेचे आणि अभिनयाचे कौतुक झाले.
4 / 9
चित्रपटाच्या यशासोबतच अभिनेत्रीचे स्टारडमही वाढले. त्यानंतर तिने 'जज्बात' आणि 'वादे इरादे' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. पण हे दोन्ही चित्रपट फारसे यशस्वी झाले नाहीत.
5 / 9
सुचित्राने सुमारे पाच वर्षांचा ब्रेक घेतला आणि कन्नड चित्रपटांकडे वळली. याच दरम्यान १९९९ मध्ये तिने स्वतःपेक्षा ३० वर्षांनी मोठे असलेले प्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूर यांच्याशी लग्न केले आणि अभिनयापासून कायमचा दुरावा घेतला. मात्र, २००७ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
6 / 9
पिंकविलाला दिलेल्या एका मुलाखतीत सुचित्राने स्वतः सांगितले होते की, तिने पतीमुळे अभिनय सोडला होता. शेखर यांना तिचा अभिनय करणे आवडत नव्हते.
7 / 9
२००५ मध्ये सुचित्रा कृष्णमूर्तीने पुन्हा चित्रपटांमध्ये पुनरागमन केले आणि अनिल कपूरसोबत 'माय वाईफ्स मर्डर' या चित्रपटात काम केले. ती चित्रपटांमध्ये नियमितपणे सक्रिय राहिली नाही आणि ब्रेक घेत काम करत राहिली, पण या काळात तिने तिच्या दुसऱ्या टॅलेंटला वेळ दिला.
8 / 9
अभिनयाव्यतिरिक्त सुचित्रा आता लेखिका देखील बनली आहे. तिने 'ड्रामा क्वीन' नावाचे स्वतःवरचे चरित्र लिहिले आहे, ज्यात तिने तिचा संघर्ष, करिअर आणि घटस्फोटाबद्दल मनमोकळेपणाने चर्चा केली आहे.
9 / 9
सुचित्राला शेवटचे 'ऑड कपल'मध्ये पाहिले गेले होते. ती संगीत क्षेत्रातही सक्रीय आहे.