सुपरस्टार सलमान खानचा सुपरहिट चित्रपट ‘जुडवा’च्या रिमेकमध्ये जॅक सध्या बिझी आहे. पण आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून जॅकलिनने तिची सहअभिनेत्री तापसी पन्नू तसेच निर्माता साजिद नाडियाडवाला व त्याची पत्नी वर्दा खान यांच्यासोबत क्वालिटी टाईम घालवला.
या फोटोंमध्ये जॅकलिन नेहमीप्रमाणे कमालीची सुंदर दिसतेय. ती केवळ मस्तीच्या मूडमध्ये आहे, हे फोटो पाहिल्यानंतर लगेच लक्षात येते. तापसीसोबतचा एक फोटो जॅकने शेअर केला आहे आणि त्याच्या कॅप्शनमध्ये तापसीला स्वत:ची ड्रिंकिंग पार्टनर म्हटले आहे. आम्ही दोघींनी वाईनच्या ग्लासमध्ये निंबू पाणी पिले, असे तिने लिहिलेय.
या फोटोंत वर्धा खानसोबतही जॅक मस्ती करतेय. दोघींनीही जवळपास सारखा पांढºया रंगाचा ड्रेस घातला आहे. ही माझी ‘सोल सिस्टर’ असे तिने वर्धासोबतच्या फोटोला कॅप्शन दिले आहे. जॅकलिनचा हा ‘मस्तीभरा अंदाज’ तुम्हीही पाहायला हवाच. शिवाय तिचा हा अंदाज तुम्हाला किती भावला, हेही आम्हाला सांगायला हवे.
जॅकलिन यापूर्वी ‘अ फ्लार्इंग जट्ट’ या चित्रपटात टायगर श्रॉफसोबत दिसली होती. हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर फार कमाल करू शकला नव्हता. लवकरच जॅकलिन सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘ए जेंटलमॅन’मध्ये दिसणार आहे.