Join us
Daily Top 2Weekly Top 5

Don't Miss : बॉलिवूड कलाकारांच्या ‘व्हॅकेशन्स’ सफरी...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:10 IST

सुट्ट्या, व्हेकेशन्समध्ये फिरायला जायला कुणाला आवडत नाही. रोजच्या रूटीन, डेली लाइफपासून थोडासा निवांतपणा अनुभवायला कुणाला नको असते. पिकनिक, रोड ट्रिप, फॅ मिली टूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जायला आपल्याला जाम मजा येते. असंच काहीसं आपल्या बॉलिवूड सेलिब्रिटींचं देखील असतं. त्यांनाही लाँग ड्राईव्ह, पिकनिक, फॅमिली टूर यांसाठी जावं वाटतं. चला तर मग पाहूयात, आपल्या लाडक्या कलाकारांना कुठे कुठे व्हॅकेशन्सवर जायला आवडते ते...

सुट्ट्या, व्हेकेशन्समध्ये फिरायला जायला कुणाला आवडत नाही. रोजच्या रूटीन, डेली लाइफपासून थोडासा निवांतपणा अनुभवायला कुणाला नको असते. पिकनिक, रोड ट्रिप, फॅ मिली टूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जायला आपल्याला जाम मजा येते. असंच काहीसं आपल्या बॉलिवूड सेलिब्रिटींचं देखील असतं. त्यांनाही लाँग ड्राईव्ह, पिकनिक, फॅमिली टूर यांसाठी जावं वाटतं. चला तर मग पाहूयात, आपल्या लाडक्या कलाकारांना कुठे कुठे व्हॅकेशन्सवर जायला आवडते ते...बॉलिवूडची चुलबूली गर्ल परिणीती चोप्रा हिला आयुष्यात एकदा तरी आॅस्ट्रेलिया सफरीवर जायचे होते. तिचे आॅस्ट्रेलियाला जायचे स्वप्न तिने अलीकडेच पूर्ण केले. तुम्ही या फोटोंवरून कल्पना करू शकता की, तिने आॅस्ट्रेलियात किती धम्माल-मस्ती, मजा केली असेल ते.‘राझी’ या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी आलिया भट्ट काश्मिरमध्ये व्यस्त आहे. एवढी व्यस्त असून देखील तिने तिच्या मैत्रीणीसाठी थोडा वेळ काढला. आणि त्या दोघी मस्तपैकी एका टूरिस्ट प्लेसला फिरायला गेल्या. तेव्हा सकाळी सकाळी त्या छान गप्पा मारत कोवळया उन्हात बसल्या होत्या.अभिनेत्री क्रिती सॅनन हिने ओमान येथे तिने तिच्या मित्रमैत्रीणींसोबत सुट्ट्यांचा आनंद लुटला. पाहा तिचा हा रिलॅक्स अंदाज आपल्यालाही प्रेमात पाडेल.विराट कोहली याची गर्लफ्रेंड अनुष्का शर्मा ही अलीकडेच विराटसोबत श्रीलंकावारी करून आली. तेव्हा या तिच्या वारीदरम्यान ती अनेक मित्रमंडळी तसेच फॅमिली मेंबरसोबत व्हेकेशन्स एन्जॉय करताना दिसली.शाहिद कपूर आणि मीरा राजपूत कपूर हे बॉलिवूडचं सर्वांत लव्हेबल कपल. हे दोघे अधूनमधून त्यांच्या डेली रूटीनमधून चेंज मिळावा म्हणून ते दोघे व्हेकेशन्सवर जात असतात. आता हेच पाहा ना, ते दोघे अलीकडेच मुलगी मीशाला घेऊन आऊटिंगसाठी गेले होते.‘दबंग गर्ल’ सोनाक्षी हिला भटकंती करायला तुफान आवडतं. वेगवेगळी ठिकाणं फिरणं, मजा-मस्ती करणं यात ती खरा आनंद शोधत असते. अलीकडेच ती परदेशात तिच्या सुट्ट्या एन्जॉय करायला गेली होती. तेव्हा तिची ही वेगळीच अदा पाहावयास मिळाली.