विशेष म्हणजे, सुक्यासोबत ओलेही जळते, त्याप्रमाणे सलमानसोबत शाहरूखवरही विनोद होत आहे. ‘ट्यूबलाईट’मुळे शाहरूखच्या ‘फॅन’चीही आठवण ताजी झाली आहे. ‘ट्यूबलाईट’च्या निमित्ताने सोशल मीडियावर पडलेले हे जोक्स वाचून आम्ही खूप हसलो, तुम्हीही हसल्याशिवाय राहणार नाहीत, हे आम्ही दाव्यानिशी सांगतो. तेव्हा वाचा आणि पोट धरून हसा!!
‘ट्यूबलाईट’चे देशभरातील शो कमी करण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी शो रद्द करण्यात आल्याचीही खबर आहे. चित्रपटाला प्रेक्षकच नाहीत, असे मल्टिप्लेक्स मालकांचे म्हणणे आहे. ‘ट्यूबलाईट’ या चित्रपटाकडून सलमानला ब-याच अपेक्षा होत्या. या चित्रपटाची तुलना सलमानच्याच ‘बजरंगी भाईजान’सोबत केली जात होती.
रिलीजनंतरच्या पहिल्या तीन दिवसांत ‘बजरंगी भाईजान’ने १०२ कोटी रूपयांचा बिझनेस केला होता. याऊलट सर्वाधिक ५५५० स्क्रिन्सवर प्रदर्शित होऊनही रिलीजनंतरच्या तीन दिवसांत ‘ट्यूबलाईट’ला केवळ ६४ कोटींचा बिझनेस करता आला. ईदच्या मुहूर्तावर ‘ट्यूबलाईट’ पेटेल, असा अंदाज होता. पण सोमवारी ईदची सुट्टी असूनही ‘ट्यूबलाईट’ फार चमक दाखवू शकला नाही. सोमवारी या चित्रपटाने केवळ १९ कोटींचा गल्ला जमवला.
ALSO READ : Tubelight Movie review : नावाप्रमाणेच ‘ट्यूबलाईट’!!