Join us

सुपर हॉट दिशा पाटनीची शिस्तबद्ध दिनचर्या, स्लिम आणि कर्व्ही फिगरचे 'हे' आहे खास रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 18:10 IST

1 / 10
बॉलिवूडमधील सर्वात फिट आणि ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये दिशा पाटानीचे नाव नेहमीच आघाडीवर असते. तिच्या टोन्ड फिगरमुळे ती लाखो लोकांसाठी फिटनेस आयकॉन बनली आहे.
2 / 10
जिमचा लूक असो किंवा बीचवरील बिकिनी फोटोशूट, दिशाची प्रत्येक स्टाईल चाहत्यांना आवडते.
3 / 10
जर तुम्हालाही दिशा पाटानीसारखी स्लिम आणि कर्व्ही बॉडी हवी असेल, तर तिची शिस्तबद्ध फिटनेस दिनचर्या तुम्हाला फॉलो करावी लागेल. चला, तिच्या फिटनेसचे रहस्य जाणून घेऊया.
4 / 10
दिशा पाटानी स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी अत्यंत कठोर परिश्रम घेते. दररोज न चुकता जिममध्ये जाते आणि तिच्या वर्कआऊट रूटीनमध्ये संतुलन राखते.
5 / 10
ती केवळ एकाच प्रकारच्या व्यायामावर अवलंबून राहत नाही. ती आपल्या वर्कआऊटमध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंग, कार्डिओ आणि योगादेखील करते.
6 / 10
या संतुलित व्यायामामुळे तिचे शरीर केवळ टोन्ड राहत नाही, तर ते लवचिक आणि मजबूत राहण्यास मदत होते.
7 / 10
दिशा पटानी शारीरिक तंदुरुस्तीसोबतच मानसिक आरोग्यालाही तितकेच महत्त्व देते. दिशा म्हणते की, मानसिक तंदुरुस्ती केवळ जिममध्येच नव्हे, तर दैनंदिन जीवनात महत्त्वाची आहे. म्हणूनच तिने तिच्या दैनंदिन दिनचर्येत ध्यानाचा नियमितपणे समावेश केला आहे.
8 / 10
वर्कआऊट्ससोबतच, दिशा तिच्या आहाराकडेही बारकाईने लक्ष देते. तिच्या आहारात मुख्यत्वे ताजी फळे, भाज्या आणि प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश असतो. प्रथिनांमुळे तिला वर्कआऊटसाठी आवश्यक ऊर्जा मिळते आणि स्नायू मजबूत होतात. ती जंक फूड आणि प्रक्रिया केलेले पदार्थ पूर्णपणे टाळते.
9 / 10
या शिस्तबद्ध आहारामुळे तिची ऊर्जा पातळी नेहमी उच्च राहते आणि तिची त्वचा निरोगी व चमकदार राखण्यास मदत होते.
10 / 10
तिच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर दिशाने आपला मोर्चा हॉलिवूडकडे वळवला आहे. प्रसिद्ध, ऑस्कर विजेते दिग्दर्शक केविन स्पेसी यांच्या 'होलीगार्ड्स' चित्रपटात ती झळकणार आहे
टॅग्स :दिशा पाटनीफिटनेस टिप्स