जॅकीच्या मुंबईतील येथील अपार्टमेंटमध्ये ही पार्टी झाली. समोर अथांग समुद्र आणि समुद्राच्या साक्षीने रंगलेली पार्टी असा काही पार्टीचा मूड होता. या पार्टीच्या काही छायाचित्रांनी गतकाळातील अनेक आठवणी जाग्या केल्या नसतील तर नवल!
या छायाचित्रात दिसतोय तो जॅकीचा सेल्फी मूड. मनीषा आणि पूजा या दोघींसोबत सेल्फी घेण्याचा मोह त्याला टाळता आला नाही.
मनीषा कोईराला आणि तब्बू या दोघींनी या पार्टीत एकत्र अशी मस्त पोझ दिली. ्न‘१९४२: अ लव्ह स्टोरी’ पासून तर ‘दिल से’ अशा अनेक चित्रपटांतून आपले सौंदर्य आणि मनमोहक हास्याने प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी मनीषा आणि ‘हैदर’सारख्या अलीकडे आलेल्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप सोडणारी तब्बू यांची ही ‘जुगलबंदी’ म्हणजे, सौंदर्य आणि कला यांचा सुंदर मिलाफ म्हणायला हवा.
कॉस्च्युम डिझाईनर अॅना सिंग हिच्या बर्थ डे पार्टींत ही ‘गँग’ जमली होती. अशावेळी एक ‘ग्रूपी’ तो बनती ही है...
मनीषाने शेअर केलेला हा फोटो म्हणजे, फ्रेन्ड लाईक फॅमिली. याच हॅटटॅग खाली तिने हा फोटो शेअर केला.
बर्थ डे गर्ल अनासोबतही मनीषाने अशी मस्त पोझ दिली.
धम्माल मस्तीनंतर रंगले ते लंच...समुद्राच्या काठी पंगत सजली अन् सगळ्यांनी आपआपल्या आवडीच्या पक्वानांवर मस्तपैकी ताव मारला.