Join us  

माधुरी दीक्षितला नकार देणाऱ्या सुरेश वाडकरांची पत्नीही आहे तितकीच सुंदर; पाहा Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2021 5:51 PM

1 / 11
कलाविश्वातील सुरेल गायक म्हणून सुरेश वाडकर यांचं नाव कायमच अग्रस्थानी घेतलं जातं. सुरेश वाडकरांच्या सुरांची जादू सातासमुद्रापारपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे आज त्यांचा मोठा चाहता वर्ग असल्याचं पाहायला मिळतं.
2 / 11
सुरेश वाडकर यांच्या प्रोफेशनल लाइफसोबतच त्यांची पर्सनल लाइफही तितकीच चर्चेत राहिलेली आहे. विशेष म्हणजे त्यांनी धकधक गर्ल अर्थात माधुरी दीक्षितचं स्थळ नाकारलं होतं. हे साऱ्यांनाच ठावूक आहे.
3 / 11
माधुरी खूपच सडपातळ असल्याचं म्हणत सुरेश वाडकरांनी माधुरीच्या स्थळाला नकार दिला होता.
4 / 11
माधुरीला नकार दिल्यानंतर सुरेश वाडकरांनी पद्मा वाडकर यांच्यासोबत लग्न केलं.
5 / 11
विशेष म्हणजे पद्मा वाडकर या प्रसिद्ध गायिका असून त्या सौंदर्याच्या बाबतीतही कोणत्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाहीत.
6 / 11
पद्मा वाडकर यांनी अनेक लोकप्रिय गाणी गायली असून त्यांचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे.
7 / 11
१९८८ मध्ये सुरेश वाडकर यांनी पद्मा वाडकर यांच्यासह लग्न केले. सुरेश आणि पद्मा यांना दोन मुली आहेत. अनन्या आणि जिया वाडकर अशी त्यांची नावं आहेत.
8 / 11
सुरेश वाडकर आणि पद्मा वाडकर या दाम्पत्यांच्या आवाजातले 'पाठशाला' फेम दिग्दर्शक मिलिंद ऊके यांच्या सिनेमात पहिल्यांदा मराठी गाणे एकत्र गायले होते.
9 / 11
'राजना साजणा' या गाण्याच्या निमित्ताने सुरेश वाडकर आणि पद्मा वाडकर मराठीत पहिल्यांदाच ड्युएट गाताना दिसले त्यामुळे हे गाणे अधिकच स्पेशल होते.
10 / 11
सौंदर्याच्या बाबतीत पद्मा कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा कमी नाहीत
11 / 11
माधुरी दीक्षितला सुरेश वाडकरांनी नकार दिल्यानंतर त्यांनी डॉ. श्रीराम नेने यांच्यासोबत लग्नगाठ बांधली.
टॅग्स :माधुरी दिक्षितसेलिब्रिटीसिनेमासुरेश वाडकर