Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोणत्या फिल्मी कथेपेक्षा कमी नव्हती धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची लव्हस्टोरी, लग्नासाठी बदलला होता धर्म?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 15:09 IST

1 / 8
बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यांचा जेव्हा कधी विषय निघतो, तेव्हा धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांचं नाव सर्वात आधी घेतलं जातं. धर्मेन्द्र आणि हेमा मालिनी हे बॉलिवूडमधील 'पॉवर कपल' आहेत आणि त्यांची लव्हस्टोरी खूपच खास आहे.
2 / 8
धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्या प्रेमात कोणताही धर्म पाहिला नाही. जेव्हा धर्मेंद्र यांना हेमा मालिनी आवडायला लागल्या, तेव्हा ते आधीच विवाहित होते. त्यांनी पहिली पत्नी प्रकाश कौर यांना घटस्फोट न देता हेमा मालिनी यांच्याशी लग्न केले होते.
3 / 8
धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची भेट एका चित्रपटाच्या सेटवर झाली होती. धर्मेंद्र हेमा मालिनी यांच्या प्रेमात इतके वेडे झाले होते की, त्यांनी पहिली पत्नी प्रकाश कौर आणि चार मुले असतानाही दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला.
4 / 8
धर्मेन्द्र यांचं पहिलं लग्न वयाच्या १९ व्या वर्षी प्रकाश कौर यांच्याशी झालं होतं. धर्मेन्द्र आणि हेमा मालिनी यांनी १९८० साली लग्न केले.
5 / 8
असे म्हटले जात होते की, हेमा मालिनी यांच्याशी लग्न करण्यासाठी धर्मेंद्र यांनी आपला धर्म बदलला होता. कारण त्यांना त्यांच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट द्यायचा नव्हता. परंतु या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही.
6 / 8
धर्मेंद्र यांनी स्वतः २००४ मध्ये एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांनी लग्नासाठी कधीही धर्म बदलला नाही आणि ही केवळ एक अफवा आणि खोटी बातमी होती.
7 / 8
धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता, असे म्हटले जात होते. त्यानंतर त्यांनी आपले नाव बदलून दिलावर खान आणि हेमा मालिनी यांनी आयशा असे ठेवले होते. परंतु तसे काहीही झाले नव्हते आणि धर्मेंद्र यांनी स्वतः या गोष्टी चुकीच्या असल्याचे सांगितले होते.
8 / 8
लग्नानंतर धर्मेंद्र आणि हेमा मालिनी हे दोन मुलींचे पालक झाले. त्यांना ईशा देओल आणि अहाना देओल या दोन मुली आहेत.
टॅग्स :धमेंद्रहेमा मालिनीइशा देओल