1 / 8बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांची आज जगाचा निरोप घेतला. आज पहाटे त्यांची प्राणज्योत मानवली. दिलीप कुमार यांच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. दिलीप कुमार यांना सावली सारखी सोबत देणाºया त्यांच्या पत्नी सायरा बानो कोलमडून गेल्या आहेत. 2 / 8गेल्या काही वर्षांपासून दिलीप कुमार अंथरूणावर होते. सायरा यांनी अगदी तळहाताच्या फोडासारखे त्यांना जपले होते.3 / 8पण आज सायरा यांना मागे सोडून दिलीप कुमार यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनानंतर सायरांची अवस्था हृदय हेलावून टाकणारी होती.4 / 8दिलीप कुमार यांचे पार्थिव रूग्णालयातून घरी आणले, त्यावेळी सायरा त्यांच्या पार्थिवाशेजारी बसून होत्या.5 / 8रूग्णवाहिकेत दिलीप कुमार यांचे पार्थिव होते आणि सायरा त्यांच्या पार्थिवाकडे एकटक बघत होत्या.6 / 8सायरा यांच्या डोळयांतील अश्रू थांबत नव्हते. सायरांनी शेवटपर्यंत पतीची सोबत दिली. सायरा यांनी दिलीप कुमार यांना अखेरच्या श्वासापर्यंत साथ दिली, त्यांचा सांभाळ केला.7 / 8दिलीप कुमार व सायरा यांच्या वयात मोठा फरक होता. पण हा फरक त्यांच्या प्रेमाआड कधीच आला नाही.8 / 8लग्नानंतरही सायरा चित्रपटात काम करत होत्या. पण 1976 नंतर त्यांनी काम थांबवून पूर्णवेळ पतीसाठी दिला. दिलीप कुमार यांना सायरा बानो कोहिनूर मानत. एक अनमोल कोहिनूर मला देवाने दिलाये, असे म्हणत त्या प्रत्येक मुलाखतीत देवाचे आभार मानत.