सर्वसामान्य व्यक्तिसारखी ती आरती करताना दिसली. कुठलाही बडेजाव नाही, चेह-यावर कुठलाही दर्प नाही हे तिचे रूप सगळ्यांनाच मोहवून गेले.
आरती करतानाचे तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यात दीपिकाच्या चेहºयावर एक वेगळीच शांती दिसतेय. चित्त स्थिर दिसतेय. गंगा किना-यावर दीपिकाने यज्ञात आहुतीही दिली.
ऋषिकेशची तिची ही भेट अतिशय गुप्त ठेवण्यात आली होती. मीडियालाही याची भणक लागू नये, हेच तिचे प्रयत्न होते. अर्थात तरिही ती कॅमेºयांच्या नजरेतून स्वत:ला वाचवू शकली नाही.
१३ किलोमीटरचा लाँग कट घेऊन दीपिका परमार्थ घाटावर पोहोचली. अर्थात ती येथे पोहोचल्याची बातमी वाºयासारखी पसरली आणि मग तिला पाहण्यासाठी लोकांची एकच गर्दी उसळली. यावेळी काही पत्रकारांनी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण दीपिकाने अतिशय विनम्रपणे बोलण्यास नकार दिला. गंगा आरतीनंतर पावणे आठच्या सुमारास दीपिका सडकमार्गे आपल्या हॉटेलकडे निघून गेली. या काळात तिच्या चेहºयावरील स्मितरेषा जराही ढळली नाही. गंगा आरतीनंतर एक आत्मिक, अनामिक शांती घेऊन दीपिका पुन्हा एकदा तिच्या त्याच ग्लॅमर दुनियेत परतणार. कॅमेºयासमोर एक नवा चेहरा धारण करणार. या मार्गात एक आत्मिक शांती कायम तिच्या सोबत असावी, हीच आशा बाळगू यात.