Join us
Daily Top 2Weekly Top 5

दीपिका पादुकोणप्रमाणे ग्लॅमरस नाही तिची लहान बहीण, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:58 IST

बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण हिच्या सौंदर्याचे कोणी दिवाने नसतील असे म्हणणे जरा घाईचेच ठरेल. कारण दीपिकाची प्रत्येक अदा घायाळ करणारी असून, तिच्या ग्लॅमरस अंदाजावर केवळ भारतातीलच चाहते नव्हे तर जगभरातील चाहते फिदा आहेत. परंतु दीपिकाची लहान बहीण अनिशा पादुकोण, मात्र तिच्याप्रमाणे फारशी ग्लॅमरस नाही.

बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण हिच्या सौंदर्याचे कोणी दिवाने नसतील असे म्हणणे जरा घाईचेच ठरेल. कारण दीपिकाची प्रत्येक अदा घायाळ करणारी असून, तिच्या ग्लॅमरस अंदाजावर केवळ भारतातीलच चाहते नव्हे तर जगभरातील चाहते फिदा आहेत. परंतु दीपिकाची लहान बहीण अनिशा पादुकोण, मात्र तिच्याप्रमाणे फारशी ग्लॅमरस नाही. २७ वर्षीय अनिशाचा जन्म २ फेब्रुवारी १९९१ मध्ये झाला. अनिशाने मोठी बहीण दीपिकाप्रमाणेच ग्लॅमर वर्ल्डची निवड केली आहे. मात्र तिला अभिनयात नव्हे तर स्पोर्ट्समध्ये आवड आहे.स्पोर्ट्समध्ये ती वडील प्रकाश पादुकोणप्रमाणे बॅडमिंटन फिल्डमध्ये नव्हे तर एक गोल्फर म्हणून खेळणे पसंत करते.दीपिका जशी ग्लॅमरस आहे, तशी अनिशा तिच्या एकदमच विपरीत आहे. ती सध्या गोल्फ या खेळात करिअर करीत आहे.अनिशाने या खेळात भारताला आंतरराष्टÑीय स्तरावर रिप्रेजेंट केले आहे. अनिशाने वयाच्या १२व्या वर्षीच गोल्फ खेळण्यास सुरुवात केली. ती गोल्फ व्यतिरिक्त क्रिकेट, हॉकी, टेनिस आणि बॅडमिंटनही खेळते.दीपिका आणि अनिशामध्ये एक चांगली ब्रॉन्डिंग आहे. अनिशाने एका मुलाखतीत सांगितले होते की, दीपिका तिची आईप्रमाणे काळजी घेते. ती माझ्याबद्दल खूपच केअरिंग आणि प्रोटेक्टिव आहे.दीपिका तिच्या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये प्रचंड व्यस्त असते. त्यामुळे ती बहिणीसाठी पुरेसा वेळ देऊ शकत नाही.मात्र जेव्हा या दोघी एकत्र येतात तेव्हा त्यांचा ट्यूनिंग बघण्यासारखी असते.अनिशा दीपिकासोबत बºयाचशा बॉलिवूड इव्हेंटमध्ये बघावयास मिळाली आहे.दीपिका सध्या तिच्या ‘पद्मावत’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.