होय, सुप्रसिद्ध सिनेमेटोग्राफर के यू मोहनन यांची लाडकी लेक आणि मल्याळम चित्रपटांची एक लोकप्रीय अभिनेत्री.
मालविकाला मजीदींच्या या चित्रपटाची लॉटरी लागली आहे. चित्रपटाच्या मेकर्सनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. खुद्द मजीदी यांनी मालविकाची लूक टेस्ट घेतली आणि तिच्या परफॉर्मन्सनी मजीदी कमालीचे प्रभावित झालेत. मालविकाने सन २०१३मध्ये मल्याळम चित्रपटाद्वारे अॅक्टिंग डेब्यू केला होता. या चित्रपटाचे नाव आहे ‘नानू मट्टू वरलक्ष्मी.’
Beyond The Clouds हा बहिण-भावाच्या नात्यावर आधारित चित्रपट आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी माजीद यांनी नीलीमा अजीम आणि राजेश खट्टर यांचा मुलगा तसेच शाहिद कपूरचा भाऊ इशान याची निवड केली आहे. या चित्रपटाचे आधीचे नाव ‘फ्लोटिंग गार्डन्स’असे होते. पण आता याचे नाव बदलून Beyond The Clouds असे ठेवण्यात आले आहे.