फॅशन डिझायनर नईम खान यांनी डिझाइन केलेल्या या गोल्डन गाउनमध्ये दीपिकाने कार्यक्रमस्थळी एंट्री करताच सगळ्याच्या नजरा तिच्यावर खिळल्या. कारण दीपिकाचा हा आऊटफिट खूपच बोल्ड होता. या गाउनमध्ये दीपिकाची नेकलाइन स्पष्टपणे दिसत होती. अतिशय स्टनिंग अंदाजात दिसत असलेली दीपिका मात्र हा गाऊन कॅरी करताना खूपच अनकम्फर्टेबल वाटत होती.
ती वारंवार गाउन सावरताना दिसत होती. माध्यमांशी बोलताना तर तिची चांगलीच फजिती झाली होती. नेकलाइन झाकण्यासाठी तिची धडपड स्पष्टपणे दिसली. त्याचबरोबर विन डिझेल याला भेटण्यासाठी येणाºया बॉलिवूड कलाकारांसोबत बोलतानाही ती या गाउनमुळे अनकम्फर्टेबल असल्याचे स्पष्टपणे दिसत होती.
नुकत्याच झालेल्या गोल्डन ग्लोब अवॉर्डसमध्ये प्रियांका चोप्रा अशाच प्रकारच्या आऊटफिटमध्ये दिसली होती. तिचा हा ड्रेस डिझायनर राल्फ लॉरेन यांनी डिझाइन केला होता. 9 जानेवारी रोजी झालेल्या या अवॉर्ड सेरेमनीच्या तीन दिवसांनी दीपिका पादुकोन प्रियाकाने परिधान केलेल्या आऊटफिटसारख्या गाउनमध्ये दिसली. पण काहीही असो दीपिका जरी या गाउनमध्ये अनकम्फर्टेबल दिसली असली तरी तिचा अंदाज विन डिझेल याला भावला नसेल तरच नवल.