Join us  

कोरोनामुळे अख्खं जग त्रस्त, कलाकार मात्र पार्टी करण्यात व्यस्त, पाहा हे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 1:52 PM

1 / 12
बॉलिवूडमध्ये पार्टी करण्यासाठी काही खास कारण लागत नाही, त्यामुळे अनेकदा या पार्ट्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात.
2 / 12
गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे सारेच घरात बंदिस्त होते, त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आणि हळुहळु सगळे काही पूर्ववत झाले.
3 / 12
लॉकडाऊन हटवल्यानंतर सेलिब्रेटींनी तर व्हॅकेशनच्या नावाखाली सगळेच नियम धाब्यावर बसवत फुल ऑन मजा मस्ती करताना दिसले.
4 / 12
कोरोना काळातही अनेक कलाकार मालदीव्हजला व्हॅकेशनसाठी गेल्याचे पाहायला मिळाले.
5 / 12
लॉकडाऊन हटवले होते मात्र कोरोना गेला नव्हता हे माहिती असूनही कलाकार मात्र त्यांच्या आयुष्यात रमले होते.
6 / 12
इतरांना स्टे सेफ, स्टे होम म्हणत सुटणारे कलाकार स्वतःमात्र या सगळ्या गोष्टीपासून अनभिज्ञ असल्यासारखेच वागत होते.
7 / 12
पुन्हा एकदा कोरोनाची लाट येते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, प्रत्येकानेच जबाबदारीचे भान राखणे गरजेजे आहे.
8 / 12
असे असताना सेलिब्रेटींचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काहींनी त्यांच्या इन्स्टा स्टेटसमध्येही या पार्टीची काही झलक शेअर केली.
9 / 12
यावेळी सोशल डिस्टंसिंग तर सोडाच मास्कही कोणी लावला नसल्याचे पाहायला मिळाले.
10 / 12
पार्टीत विजय देवरकोंडाच्या उपस्थितीने चाहत्यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. बॉलिवूड गँगपासून लांबच राहण्याचा सल्ला त्याला देत आहेत.
11 / 12
प्रसिद्ध सेलिब्रेटींचे अशाप्रकारे वागणे बघून चाहते मात्र काय आदर्श घेणार हा मोठा प्रश्नच निर्माण झाला आहे.
12 / 12
विशेष म्हणजे या पार्टीत ते कलाकारही होते ज्यांची नावं ड्रग प्रकरणातून समोर आली होती.