शालेय इतिहासात ‘तैमूर’ ची नोंद :
तैमूर हे नाव प्रत्येक भारतीयांनी त्यांच्या शालेय जीवनात अभ्यासले आहे. ‘तिमूर‘ आणि ‘तेमरलेन’ म्हणून ओळखला जाणारा मोगलाई क्रूर योद्धा. पर्शिया आणि मध्य आशियाच्या अनेक भागांवर त्याने आक्रमण करून ते भाग हस्तगत केले होते. १४ व्या शतकात त्याने दिल्लीवर अधिराज्य गाजवण्यासाठी हजारो भारतीयांच्या कत्तली केल्या.
‘पँडोरा बॉक्स’ मधून बाहेर आले ‘हे’ नाव :
ग्रीक पौराणिक कथेनुसार, पँडोरा नावाच्या मुलीकडे एक बॉक्स असतो. ज्यात अनेक दुष्ट आत्मे असतात. तो बॉक्स उघडल्यास त्यातून बाहेर आलेले आत्मे पुन्हा परत जाऊ शकत नाहीत. त्याप्रमाणे तैमूर हे नाव आम्हाला पँडोरा बॉक्समधून कळाले असल्याचे सैफीनाचे म्हणणे आहे.
हिटलरपेक्षा वाईट नाव :
आपल्या मुलाचं नाव कुणी हिटलर ठेवतं का? नाही ना.. तैमूर हे नाव हिटलरपेक्षा कित्येक पटीनं वाईट आणि क्रूर समजलं जातं. इस्त्राईल किंवा युरोपातही कुणी मुलाचं नाव हिटलर ठेवत नाही. ट्विटरवर अनेकांनी याविषयी ट्विट केलेले दिसतेय.