Join us
Daily Top 2Weekly Top 5

आलिया भट-रणबीर कपूरने कुटुंबासोबत साजरा केला ख्रिसमस; राहाच्या झलकने वेधले सर्वांचं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 09:17 IST

1 / 8
बॉलिवूड कलाकारांमध्ये सध्या ख्रिसमसचा उत्साह पाहायला मिळत आहे. आलिया भट आणि रणबीर कपूर यांनीही मोठ्या उत्साहात ख्रिसमस साजरा केला. या जोडप्याने आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत या दिवसाचा आनंद लुटला, ज्याचे फोटो खुद्द आलियाने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
2 / 8
आलिया भटने इंस्टाग्रामवर ख्रिसमस पार्टीचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये अभिनेत्रीची सासू नीतू कपूर यांच्यापासून ते आई सोनी राजदान यांच्यापर्यंत सर्वजण दिसत आहेत.
3 / 8
ख्रिसमस पार्टीसाठी आलिया भटने लाल रंगाचा बॅकलेस ड्रेस परिधान केला होता, ज्यामध्ये ती अत्यंत सुंदर दिसत होती. तर रणबीर कपूर काळ्या रंगाचा टी-शर्ट, जीन्स आणि लेदर जॅकेटमध्ये अतिशय देखणा दिसत होता.
4 / 8
या सेलिब्रेशनमध्ये नीतू कपूर, रिद्धिमा कपूर आणि तिची मुलगी समायरा यांनीही आलिया-रणबीरसोबत पोझ दिली.
5 / 8
तसेच आलियाची आई सोनी राजदान आणि बहीण शाहीन भटदेखील या पार्टीत सहभागी झाल्या होत्या. सोनी राजदान काळ्या ड्रेसमध्ये क्लासी दिसत होत्या, तर शाहीनचा लाल शॉर्ट ड्रेसमधील ग्लॅमरस अवतार पाहायला मिळाला.
6 / 8
ख्रिसमस पार्टीमधून आलिया आणि रणबीरची लाडकी लेक राहा हिची झलकही समोर आली आहे. एका फोटोत राहाने लाल रंगाचा फ्रॉक घातला असून लाल रबर बँडने दोन पोनी टेल बांधल्या आहेत. दुसऱ्या एका फोटोत राहाचे इवलेसे हात पाइन ट्रीला रंगवताना दिसत आहेत.
7 / 8
राहाच्या या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले असून ते तिच्या क्युटनेसवर फिदा झाले आहेत. एका चाहत्याने लिहिले, 'राहा या कुटुंबातील सर्वात गोड सदस्य बनली आहे.' तर दुसऱ्याने म्हटले, 'राहा कपूर तिच्या नखांना लावलेल्या लाल नेलपॉलिशमुळे खूपच क्यूट दिसत आहे.'
8 / 8
आलियाने हे फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे – 'प्रेमाने वेढलेला, ख्रिसमस २०२५.'
टॅग्स :आलिया भटरणबीर कपूरनाताळ