गौरीनेही ही जबाबदारी अतिशय प्रेमाने निभावली. खोलीचे फोटो पाहता क्षणी त्याची जाणीव आपल्याला होते.
यश व रूहीच्या खोलीमध्ये भडक रंग न वापरता शुभ्र पांढ-या रंगाचा वापर करण्यात आला आहे. यात सर्वाधिक लक्ष वेधून घेत आहेत, ते म्हणजे कार्टून प्रिंट्स आणि काही खेळणी.
एकंदर काय तर रूही व यशची रूम अगदी झक्कास सजलीय. करण मुलांच्या संगोपनात कुठलीही कसर सोडू इच्छित नाही, हेही यातून दिसतेय.
ALSO READ : गौरी खानने सजवलेले रणबीरचे नवे घर तुम्ही पाहिलेयं का?
गौरी खान इंटेरिअर डिझायनिंगच्या क्षेत्रात एक मोठे नाव आहे. याआधी तिने अभिनेता रणबीर कपूरच्या नव्या घराचेही इंटेरिअर डिझायनिंग केले होते. त्यावेळी ऋषी कपूर यांनी गौरीची प्रशंसा करत तिच्या कलेला दाद दिली होती. तू घराला घर बनवले, वेल डन गौरी, असे ऋषी कपूर म्हणाले होते.