1 / 8सध्या देशाभरात तणावाचं वातावरण आहे. भारत-पाकिस्तान देशांदरम्यान युद्धजन्य परिस्थिती उद्भवली आहे. अशात सीमेवर अनेक वीर लढा देत असून आपलं संरक्षण करत आहेत.2 / 8मनोरंजनसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी हे आर्मी कुटुंबात जन्माला आले आहेत. त्यांच्या वडीलांनी भारतीय सैन्यात देशसेवा केली आहे. कोण आहे हे सेलिब्रिटी?3 / 8अभिनेत्री अनुष्का शर्माचे वडील कर्नल अजय कुमार शर्मा सेवानिवृत्त आर्मी अधिकारी आहेत. कारगील युद्धातही त्यांचा सहभाग होता. 4 / 8प्रिती झिंटाचे वडील दुर्गानंद झिंटा हेही आर्मी ऑफिसर होते. प्रिती १३ वर्षांची असतानाच त्यांचं अपघातात निधन झालं. तिची आईही या अपघातात जखमी झाली होती. प्रितीचा भाऊ दीपांकर सध्या भारतीय आर्मीमध्ये कमिशन्ड ऑफिसर आहे.5 / 8अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आर्मी ऑफिसरची मुलगी आहे. शिस्त, मूल्य आणि अनुशासन अशा वातावरणात ती लहानाची मोठी झाली. कुलविंदर सिंग तिच्या वडिलांचं नाव आहे. 6 / 8अक्षय कुमारचे वडील हरी ओम भाटिया हे देखील भारतीय सैन्यात होते. त्यांच्यामुळे आपल्याला शिस्त लागल्याचं अक्षयने एका मुलाखतीत सांगितलं होतं.7 / 8सुष्मिता सेनचे वडील शुबीर सेन भारतीय हवाई दलात विंग कमांडर होते. धाडसी हवाई दल अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. १९९१ मध्ये त्यांनी निवृत्ती घेतली.8 / 8निम्रत कौर शहीद भूपिंदर सिंह यांची मुलगी आहे. ते शौर्य चक्र प्राप्त आर्मी मेजर होते. १९९४ साली काश्मिरमध्ये असताना दहशतवाद्यांनी त्यांचं अपहरण केलं. साथीदारांची सुटका करण्याची मागणी दहशतवाद्यांनी केली होती जी भूपिंदर सिंग यांनी मान्य केली नाही. वयाच्या ४४ वर्षी ते शहीद झाले. काही वर्षांपूर्वी निम्रतने वडिलांच्या स्मरणात त्यांचे स्मारक बांधले.