कायमच आपल्या फॅशन आणि स्टाईल स्टेटमेंटसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री सोनम कपूर आकर्षक अशा लाल रंगाचा ड्रेस आणि गॉगल परिधान करुन रेड कार्पेटवर अवतरली. यावेळी सोनमची अदा आणि तिचं सौंदर्य घायाळ करणारे असेच होते.सोनाक्षी सिन्हा हिनेसुद्धा रॉकिंग अंदाजात एंट्री मारली. हिरव्या रंगाचे जॅकेट, ब्लॅक टॉप इनर आणि स्कर्ट अशा रफ एंट अंदाजात बॉलीवुडची दबंग गर्ल रेड कार्पेटवर आली आणि कॅमेरे तिच्या दिशेने वळले. मग काय सोनाक्षीनंसुद्धा ही संधी मिस केली नाही. कॅमे-यासमोर तिने एकाहून एक पोझ दिल्या. बिनधास्त, फायटर अशा सोनाक्षीच्या विविध अदांमधील पोझनं सा-यांना आकर्षित केलं.
त्याचवेळी हिरव्या रंगाचा लांब कोट आणि पलाझो पँट परिधान करुन अभिनेत्री विद्या बालन रेड कार्पेटवर आली. विद्याचा हा अंदाज किती गोड दिसतोय हे सांगण्यासाठी त्यावेळी सोनाक्षीनं तिला कडकडून मिठीही मारली.
याशिवाय खास काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्री दिया मिर्झा तर बो असलेला पांढरा शर्ट आणि फ्लॉवर डिझाईन असलेला स्कर्ट परिधान करत रेड कार्पेटवर अवतरली होती.
अभिनेत्री फ्रिडा पिंटोनंही रेड कार्पेटवर कॅमे-यांना आकर्षित केलं. बॉलीवुडच्या अभिनेत्री रेड कार्पेटवर जलवा दाखवत असताना पुरुष मंडळीही काही मागे नव्हती.
खास रॉक लिहिलेला आणि आपल्या इमेजला साजेसा टी-शर्ट घालून अभिनेता फरहान अख्तर रेड कार्पेटवर आला.
अभिनेता आयुषमान खुराणा आणि अभिनेता विवेक ओबेरॉयचा आकर्षक सूट सा-यांच्या चर्चेचा विषय ठरला.
कोल्ड प्लेच्या निमित्ताने रेड कार्पेटवरील सेलिब्रिटींचा हा फॅशनचा जलवा उपस्थितांमध्ये चर्चेचा विषय ठरला.