ग्रीन कलरच्या या फ्लोर लेंथ गाऊनमध्ये दीपिका कुठल्याही ग्रीक गॉडेसपेक्षा कमी दिसत नव्हती. ड्रेसला मॅचिंग मेकअप आणि हाय बन यामुळे तर तिचे ग्लॅमरस लूक आणखीच खुलून आले.
त्यापूर्वी दुसºयादिवशी सकाळी दीपिकाचे दोन लूक सोशल मीडियावर व्हायरल झालेत. एका फोटोत दीपिका शॉर्ट पिंक ड्रेसमध्ये दिसली तर दुस-या फोटोत पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये. या ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसत होती. एकंदर काय तर दीपिका कान्स फिल्म फेस्टिवल ख-या अर्थाने गाजवतेय, असे म्हणायला हरकत नाही. कान्सच्या रेड कार्पेटवर दीपिका एका इंटरनॅशनल फॅशन ब्रँडचे प्रतिनिधित्व करतेय. यंदा कान्सच्या रेड कार्पेटवर उतरणारी ती पहिली भारतीय सेलिब्रिटी ठरली आहे. त्यामुळे सध्या सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या आहेत.
पहिल्या दिवशी दीपिका कुठल्या आऊटफिटमध्ये रेड कार्पेटवर उतरते,कशी दिसते, हे पाहण्यास सगळे उत्सूक होते. पहिल्या दिवशी दीपिका वाइन कलरच्या ड्रेसमध्ये रेड कार्पेटवर उतरली अन् सगळ्यांच्याच हृदयाचे ठोके चुकले.या ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर तेवढीच हॉट अन् सेक्सी दिसत होती. ड्रेससोबतचा तिचा स्मोकी डार्क मेकअप तिच्या सौंदर्यात भर घालणारा होता. ज्वेलरी म्हणाल तर ड्रेससोबत मॅच होणारे इअररिंग्स आणि बोटात एक अंगठी एवढेच तिने घातले होते.
कान्सकडे संपूर्ण जगाच्या नजरा या सोहळ्याकडे लागलेल्या असतात. यंदा भारतीयांनाही या सोहळ्याची आतुरतेने प्रतीक्षा होती. त्याचे कारणही म्हणजे, बॉलिवूडची सुंदरी ऐश्वर्या राय बच्चन, बॉलिवूडची फॅशनिस्टा सोनम कपूर आणि बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण या तीन अभिनेत्री यंदा कान्सच्या रेड कार्पेटवर उतरणार आहेत.