कान्समध्ये सर्वप्रथम दीपिका रेड कार्पेटवर उतरली होती. यानंतर ऐश्वर्या राय हिने रेड कार्पेटवरील आपल्या लूकने सगळ्यांना घायाळ केले होते. ऐश्वर्यानंतर कान्सच्या रेड कार्पेटवर उतरणारी सोनम ही तिसरी भारतीय अभिनेत्री होती. कान्समध्ये सोनम, ऐश्वर्या व दीपिका या तिघींनी एका इंटरनॅशनल कॉस्मेटिक ब्रँडला प्रमोट केले.
So this is @sonamakapoor's look for red carpet tonight at #Cannes70pic.twitter.com/W93675BXs4— Sweta Kaushal (@SwetaKaushal) 22 May 2017
कान्सच्या रेड कार्पेटवरील सोनमची स्टाईल एकदम हटके ठरली. इतकी की, सोनमचा बॉयफ्रेन्ड आनंद अहुजा हा सोनमची तारीफ करताना थकत नाहीय. सोनमचा कान्समधील एक फोटो पोस्ट करत आनंदने त्याला ‘लव्ही’ असे सुुंदर गर्भित कॅप्शन दिले आहे. आनंदची ही प्रतिक्रिया निश्चितपणे सोनमला सुखावणारी आहे. सोनमच्या चेह-यावर हा ‘आनंद’ स्पष्ट दिसतो आहे.