गेल्यावर्षीच्या तुलनेत यावेळेसदेखील ऐश्वर्या हटके अंदाजात दिसत आहे. यावेळी ऐश्वर्या हिरव्या रंगाच्या नेट गाउनमध्ये बघावयास मिळाली. हा फ्लोअर गाउन खालच्या बाजूने ट्रान्सपरंट होता. यावेळी ऐर्श्याने थोडासा मेकअप करताना रोझ लिपस्टिक लावली होती. यामध्ये ऐश्वर्याचे सौंदर्य खुलून दिसत होते. ऐश्वर्याचा हा लूक समोर येताच तिच्या चाहत्यांनी त्यास प्रचंड पसंती दिली असून, तिचे फोटोज् सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
ऐश्वर्या लॉरियालची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आहे. लॉरियाल यावर्षी आपल्या आॅफिशियल मेकअप ब्रॅण्डचा २०वा वर्धापनदिन साजरा करणार आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही या ब्रॅण्डने ऐश्वर्यालाच रेड कार्पेटवर आपला जलवा दाखविण्याची संधी दिली. ऐश्वर्या २००२ सालापासून कान्समध्ये सहभागी होत आहे. फेस्टिव्हल १७ मे रोजी सुरू झाला असून, २८ मेपर्यंत चालणार आहे. गेल्यावर्षीप्रमाणे याही वर्षी ऐश्वर्या मुलगी आराध्यासोबत कान्स फेस्टिव्हलला पोहोचली आहे.
या फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्याला १६ वर्षं पूर्ण होत आहेत. २००२ मध्ये तिने पहिल्यांदाच ‘देवदास’ चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साली आणि शाहरूख खान याच्यासोबत रेड कार्पेटवर एंट्री केली होती. दरम्यान, कान्समध्ये सहभागी होण्यासाठी ऐश्वर्या गुरुवारीच मुलगी आराध्यासोबत फ्रान्सला पोहोचली. दुपारच्या वेळेस ऐश्वर्या मुलीसोबत वेळ व्यतीत करताना दिसली होती. तसेच या दोघी हॉटेल मार्टिनेजच्या बाहेर निघताना बघण्यात आले होते. यावेळी आराध्यानेही फोटोग्राफर्सला पोझ दिली.