मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची पुतणी इशिता हिच्या लग्नाचा बार लवकरच उडणार आहे. याच आनंदात मुकेश अंबानी यांनी एक जंगी पार्टी दिली. या पार्टीला ऐश्वर्या राय, शाहरूख खान, आमिर खान यांच्यासह दीपिका व रणवीरही पोहोचले. पण कसे? तर हातात हात घेऊन...होय. रणवीर व दीपिका परस्परांपासून विभक्त झालेत अशी बातमी चर्चेत असताना दोघांचेही असे हातात हात घालून अंबानीच्या पार्टीत दिसणे सगळ्यांनाच सुखद धक्का देऊन गेले.
रणवीर व दीपिका यांच्या ब्रेकअपमागे रणवीरची त्याची ‘बेफिक्रे’ को-स्टार वाणी कपूर हिच्यासोबत वाढती सलगी हेही एक कारण सांगितले गेले. पण अंबानीच्या पार्टीत मुळात दोघांमध्येही कुठलाही दुरावा नसल्याचेच स्पष्टपणे दिसले.
क्रिम रंगाच्या साडीतील दीपिका रणवीरसोबत अतिशय आनंदात असल्याचे यावेळी पाहायला मिळाले. दोघेही परस्परांची कंपनी एन्जॉय करत असल्याचे त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून स्पष्टपणे दिसत होते. दीपिकाचा हात हातात घेण्यापासून तर तिच्यासाठी गाडीचा दरवाजा उघडण्यापर्यंतचे ‘जेन्टलमन’ रणवीरचे वागणे पाहून कुणीही भारावून जावे. मग दीपिका भाळली तर त्यात नवल कुठले?