Join us

IN PICS: एंटरटेनमेंटचा धमाका! या महिन्यांत मिळणार 9 सिनेमे व वेबसीरिजची मेजवाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2020 16:52 IST

1 / 10
दिवाळीच्या मुहूर्तावर मनोरंजन हवे तर चिंता नाही. होय, या महिन्यांत तुमच्या मनोरंजनाची जय्यत तयारी आहे. होय, उद्या 9 नोव्हेंबरपासून 9 सिनेमे व वेबसीरिज रिलीज होत आहेत.
2 / 10
अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी’ हा सिनेमा उद्या 9 नोव्हेंबरला डिज्नी हॉटस्टारवर रिलीज होतोय. अक्षय कुमारसोबत कियारा अडवाणी यात लीड भूमिकेत आहे. हा सिनेमा ‘कंचना’ या तामिळ सिनेमाचा हिंदी रिमेक आहे.
3 / 10
बॉबी देओलची आश्रम 2 ही वेबसीरिज एमएक्स प्लेअरवर येत्या 11 तारखेला रिलीज होतेय.
4 / 10
अभिषेक बच्चनच्या चाहत्यांसाठी प्रतीक्षा संपली आहे. अभिषेक मुख्य भूमिकेत असलेला ‘लुडो’ हा सिनेमा येत्या 11 नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर रिलीज होतोय.
5 / 10
मम भाई ही वेबसीरिज आॅल्ट बालाजीवर झी5 वर रिलीज होतोय. यासाठी 12 नोव्हेंबरचा मुहूर्त निवडण्यात आला आहे.
6 / 10
दिलजीत दोसांज, मनोज वाजपेयी, फातिमा सना शेख अशी जबरदस्त स्टारकास्ट असलेला ‘सूरज पे मंगल भारी’ हा सिनेमा 13 तारखेला चित्रपटगृहांत रिलीज होतोय.
7 / 10
राजकुमार राव व नुसरत भरूचा यांचा ‘छलांग’ हा सिनेमा 13 नोव्हेंबरला अ‍ॅमेझॉन प्राईमवर तुम्ही बघू शकणार आहात.
8 / 10
दिव्येंन्द्र शर्माचे चाहते असाल तर त्याची आणखी एक वेबसीरिज ‘बिच्छू’ येत्या 18 नोव्हेंबरला झी 5 वर रिलीज होतेय.
9 / 10
अनुप सोनी व पाऊली दाम यांची ‘रात बाकी है’ वेबसीरिज झी 5 वर पाहायला मिळणार आहे
10 / 10
राजीव खंडेलवालची ‘नक्सलबाडी’ ही वेबसीरिज येत्या 28 नोव्हेंबरला झी5 वर तुम्ही बघू शकाल.
टॅग्स :बॉलिवूड