Join us

'बिल्ला' साकारुन हिट झाला, मुलाच्या निधनाने पुरता खचला; बॉलिवूडच्या 'या' खलनायकाची स्टोरी वाचून भावुक व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 17:22 IST

1 / 8
हिंदी चित्रपटसृष्टीत खलनायक साकारणाऱ्या कलाकारांची परंपरा मोठी आहे. तरी त्यातील काही कलावंत असे होते की ज्यांनी पडद्यावर नायकापेक्षा खलनायिकी भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.
2 / 8
एकेकाळी बॉलिवूडमध्ये अॅक्शनपटांची चलती असताना चित्रपटात नायकाला टक्कर देणारा खलनायक निवडणं हेही निर्मात्यांसाठी मोठं आव्हान होतं.
3 / 8
प्राण, जीवन, अजित, अमरीश पुरी आणि प्रेम चोपडा यांच्या खलनायकांसोबत ७० - ८० च्या दशकात कायम दिसणारा एक चेहरा म्हणजे अभिनेता माणिक इराणी.
4 / 8
माणिक इराणी आजही सिनेरसिकांमध्ये बिल्ला या नावाने प्रसिद्ध आहेत. आपल्या कारकि‍र्दीत त्यांनी जवळपास १०० हून अधिक चित्रपटातून खलनायक तसेच खलनायकाच्या सहाय्यकाची भूमिका वठवली. १९९२ मध्ये प्रदर्शित झालेला दीदार हा त्यांचा अखेरचा चित्रपट होता.
5 / 8
माणिक इराणी त्यांचा लूक आणि शरीरयष्टीसाठी ओळखले जायचे. या अभिनेत्याची डॉयलॉग डिलीव्हरीही वेगळीच असे त्यामुळे ते त्यांच्या अभिनयात जीव टाकत.
6 / 8
'कालीचरण', 'त्रिशूल', 'मिस्टर नटवरलाल', 'शान', 'कसम पैदा करनेवाले की' यांसारख्या चित्रपटात काम केलं आहे.
7 / 8
माणिक इराणी यांनी अत्यंत मेहनतीने चित्रपटसृष्टीत नाव कमावलं. मात्र, पैसा आल्यावर काही वाईट सवयींनी साथ धरली. यात दारु पिण्याची सवय त्यांना लागली.
8 / 8
असंही म्हटलं जातं की पत्नी सोडून गेल्यानंतर त्यांनी एकट्याने आपल्या मुलाचं संगोपन केलं.मात्र, दुर्दैवाने अगदी कमी वयातच त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला. त्या धक्क्यानंतर ते व्यसनाच्या आहारी गेले.
टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटी