ओशिवारा भागातील स्मशानभूमीमध्ये काल संध्याकाळी मुलगा इशानच्या हस्ते त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी इंडस्ट्रीमधील अनेक मान्यवर मंडळी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होते. जावेद अख्तर, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, इरफान खान, सुधीर मिश्रा, कबीर खान, शबाना आझमी, पत्नी नंदिता, जॉनी लिव्हर, विद्या बालन, पंकज कपूर, सुप्रिया पाठक, जेष्ठ अभिनेते शशी कपूर, अनिल कपूर, रत्ना पाठक, विवान शहा आदी कलाकार यावेळी हजर होते.
अमिताभ बच्चन
सुधीर मिश्रा आणि इरफान खान
अभिषेक बच्चन
जॉनी लिव्हर
विद्या बालन
कबीर खान
पंकज कपूर आणि सुप्रिया पाठक
शशी कपूर
अनिल कपूर
रत्ना पाठक आणि विवान शहा
जावेद अख्तर
शबाना आझमी
नंदिता पुरी
मुलगा इशान पुरी
एक हरहुन्नरी आणि पूरिपूर्ण अभिनेता गमावल्याची भावना यावेळी सर्वांनी व्यक्त केली. ओम पुरी यांनी बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. त्यांचे खासगी जीवन नेहमीच वादग्रस्त राहिले. सामाजिक विषयावर टीकाटिप्पणी करण्यामुळे ते अनेकदा वादात अडकले होते.
सुत्रांनुसार ओम पुरी यांचा मृत्यू जरी हृदयविकाराच्या झटक्याने झाला असला तरी त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूवर दुखापत झालेली होती. त्याचे कारण शोधण्यासाठी या प्रकारणाची पोलिस चौकशी करणार आहेत. घराचा पंचनामा केला असता घरामध्ये दारूच्या बाटल्या मिळाल्या आहेत. मृत्यू होण्याच्या आदल्या दिवशीसुद्धा त्यांनी मद्यपान केले होते अशी माहिती देण्यात आली आहे. ‘आम्ही सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करणार आहोत, सोबतच त्यांच्याकडे येणाऱ्या-जाणाऱ्याची चौकशी केली जाणार आहे, गरज पडल्यास नंदिती नंदिता पुरी यांची देखील चौकशी केली जाईल असे पोलिसांनी सांगितले.