Join us  

वय म्हणजे नुसता आकडा आहे हे या जोडप्यांकडे पाहून समजतं...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2021 8:00 AM

1 / 10
प्रियंका चोप्रा आज ग्लोबल स्टार म्हणून ओळखली जाते. अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत ती लग्न बंधनात अडकली. निक प्रियंकापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. दोघेही संसारात आनंदी आहेत.
2 / 10
संजय दत्त व मान्यता दत्त या दोघांच्या वयामध्ये जवळपास 19 वर्षांचं अंतर आहे. आज हे कपल आनंदाने नांदतेय.
3 / 10
करिना कपूर व सैफ अली खान यांच्यात तर वयाचा मोठा फरक आहे. करिना ही सैफपेक्षा 11 वर्षांनी लहान आहे. दोघांनाही दोन मुलं आहेत.
4 / 10
मिलिंद सोमन त्याची बायको अंकिता या दोघांत वयाचे खूप मोठे अंतर आहे. दोघे यावरून ट्रोलही होतात. मिलिंद हा अंकितापेक्षा 24 वर्षांनी मोठा आहे.
5 / 10
शाहिद कपूर व मीरा राजपूत बॉलिवूडचे क्यूट कपल. या दोघांत 13 वर्षांच अंतर आहे. शाहिद मीरापेक्षा मोठा आहे.
6 / 10
मराठी सेलिब्रिटीही यात मागे नाहीत. मराठीचे दिग्गज अभिनेत अशोक सराफ व त्यांच्या पत्नी निवेदिता सराफ यांच्यात 18 वर्षांचे अंतर आहे.
7 / 10
ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर व त्यांच्या पत्नी सुप्रिया पिळगावकर हे मराठी सिनेसृष्टीतील सुपरस्टार म्हणून ओळखले जातात. दोघांमध्ये 10 वर्षांचा फरक आहे.
8 / 10
रितेश देशमुख व जिनिलीया देशमुख हे बॉलिवूडचे लोकप्रिय कपल. रितेश हा जिनिलीया पेक्षा 9 वर्षांनी मोठा आहे.
9 / 10
मराठीतील क्यूट कपल उमेश कामत व प्रिया बापट यांच्या वयात 8 वर्षांचे अंतर आहे.
10 / 10
टीव्हीवरचे लोकप्रिय कपल किश्वर मर्चंट व सुयश राय यांच्यात 8 वर्षांचे अंतर आहे. किश्वर सुयशपेक्षा 8 वर्षांनी मोठी आहे.
टॅग्स :बॉलिवूडउमेश कामतप्रिया बापटप्रियंका चोप्रासंजय दत्त