Join us

लग्नाच्या पहिल्याच दिवशी विपरीत घडलं, सासूने घराबाहेर काढलं अन्...; अभिनेत्रीच्या संसारात काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 17:33 IST

1 / 7
बॉलिवूड अभिनेत्री आणि राजकारणी बनलेली आणि सामाजिक कार्यकर्त्या अशी ओळख असलेली अभिनेत्री नफीसा अली तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जातात.
2 / 7
नफीसा अली यांनी १९७९ मध्ये 'जुनून' या चित्रपटातून इंडस्ट्रीत पदार्पण केलं. त्या शेवटच्या अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'उंचाई' चित्रपटात झळकल्या. १९७६ मध्ये नफीसा यांनी मिस इंडियाच्या मुकुटावर आपलं नाव कोरलं.
3 / 7
दरम्यान, ही अभिनेत्री आपल्या अभिनय कारकीर्दीपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत राहिली. नफीसा अली यांनी सात वर्षांपूर्वी कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर मात केली होती. मात्र, पुन्हा या जीवघेण्या आजाराने डोकं वर काढलंय.नफीसा सध्या चौथ्या स्टेजच्या कॅन्सरशी झुंज देत आहेत. त्यामुळे त्यांचे चाहते देखील प्रचंड चिंतेत आहेत.
4 / 7
नफिसा अली या ८०-९० च्या दशकातील एक प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहेत. मात्र,काही वर्षांपूर्वांपासून नफीसा कर्करोगामुळे अभिनय क्षेत्रापासून दूरावल्या.
5 / 7
'जुनून',मेजर साहब, लाइफ इन अ मेट्रो, यमला पगला दीवाना, गुजारिश हे त्यांचे गाजलेले सिनेमे आहेत. प्रसिद्धीच्या शिखरावर नफीसा अली यांनी तिने कुटुंबाच्या दबावाला बळी पडून चित्रपटसृष्टी सोडली होती, असंही सांगण्यात येतं.
6 / 7
मुस्लिम कुटुंबातून आलेल्या नफीसा अली यांनी रविंदर सिंग सोधी या शीख कुटुंबातील व्यक्तीशी लग्न केलं. त्यांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं,पण लग्नात धर्म अडथळा होता.लग्नानंतर जेव्हा रविंदर नफीसाला घरी घेऊन आले तेव्हा त्यांची आई प्रचंड रागावली होती.
7 / 7
असंही सांगण्यात येतं की पहिल्याच दिवशी नफीसा अली यांना त्यांच्या सासरच्या घरातून हाकलण्यात आलं होतं. त्यानंतर नफीसा यांना त्यांच्या पतीच्या मित्रांच्या घरी राहावं लागलं होतं.
टॅग्स :नफीसा अलीबॉलिवूडसेलिब्रिटी