Join us
Daily Top 2Weekly Top 5

श्रीदेवी अन् माधुरीच्या स्टारडमला टक्कर देणारी अभिनेत्री! प्रसिद्धीकडे पाठ फिरवून सोडली मुंबई, चालवते डान्स स्कूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 18:15 IST

1 / 9
८०-९० च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत आघाडीवर असणारी नायिका म्हणजे मीनाक्षी शेषाद्री.
2 / 9
आपल्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या या नायिकेने प्रसिद्धीच्या शिखरावर असताना चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला.
3 / 9
वयाच्या १७ व्या वर्षी मिस इंडियाचा खिताब जिंकून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आणि रातोरात तिला प्रसिद्धी मिळाली.
4 / 9
अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री यांचं खरं नाव हे शशिकला आहे. मात्र, सिनेविश्वात पाऊल ठेवण्याआधी त्यांनी नावात बदल केल्याचं म्हटलं जातं.
5 / 9
मनोज कुमार यांच्या पेंटर बाबू या चित्रपटातून मीनाक्षी यांनी चंदेरी दुनियेत प्रवेश केला. पण चित्रपट दणकून आपटला. पहिल्याच पायरीवर अपयश मिळाले.
6 / 9
त्यानंतर जॅकी श्रॉफ यांच्याबरोबर हिरो सिनेमात झळकल्या. हा चित्रपट सुपरहिट झाला. मीनाक्षी एका रात्रीतून स्टार बनली. हिरोचे यश आर्थिक बाजूत मोजायचे म्हटले तर त्याकाळी म्हणजे 1983 ला या चित्रपटाने 13 कोटी रुपयांचा गल्ला जमवून रेकॉर्ड निर्माण केला होता.
7 / 9
त्यानंतर अमिताभ बच्चन यांच्यासोबत आलेले गंगा जमुना सरस्वती, तुफान, अकेला या चित्रपटांनी मीनाक्षीचे स्टारडम अधिकच वाढवले. ८०-९० च्या दशकात श्रीदेवी आणि माधुरी दीक्षितच्या स्टारडमला टक्कर देणारी मीनाक्षी या एकमेव अभिनेत्री होत्या.
8 / 9
दरम्यान,आपल्या अभिनयामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असणाऱ्या या अभिनेत्रीची लव्हलाईफमुळेही तितकीच चर्चा झाली.फिल्मी पार्टीत भेटलेल्या व्यक्तीच्या ती प्रेमात पडली. 1995 ला तिने इन्व्हेस्टमेंट बँकर हरीश मायर यांच्याशी विवाह केला अर्थात ही गोष्ट त्यांनी जाहीर केली नव्हती.
9 / 9
त्यानंतर मीनाक्षी परदेशात निघून गेल्या.मात्र, शास्त्रीय नृत्य त्यांनी सोडलं नाही. टेक्सास येथे मीनाक्षी यांचा डान्स ट्रेनिंग स्कूल आहे.
टॅग्स :मिनाक्षी शेषाद्रीबॉलिवूडसेलिब्रिटी