बॉलिवूडची पहिली 'खाष्ट सासू'; सिनेसृष्टीतील गुणी अभिनेत्रीचा झालेला करुण अंत, वाचून डोळ्यांत पाणी येईल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 18:03 IST
1 / 8चित्रपटसृष्टीत यशस्वी होण्यासाठी केवळ नशीब नाही तर जिद्द आणि मेहनत घेण्याची तयारी असली तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही.याचं उत्तम उदाहरण म्हणजे अभिनेत्री ललिचा पवार.2 / 8 पडद्यावर कधी खाष्ट सासू तर कधी कठोर आई साकारून प्रेक्षकांच्या मनं जिंकली. त्यांनी काही चित्रपटांमध्ये साधी, सोज्वळ भूमिकाही साकारली पण त्यांना खलनायिकेच्या भूमिकांतूनच खरी ओळख मिळाली.3 / 8ललिता पवार यांचा जन्म १८ एप्रिल १९१६ मध्ये येवल्याचे लक्ष्मणराव सगुण यांच्या घरी झाला. अगदीच वयाच्या ९ व्या वर्षापासून त्यांनी अभिनयाचे धडे गिरवायला सुरुवात केली. 4 / 8 उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच त्या उत्कृष्ट गायिका देखील होत्या.१९२८ च्या ‘राजा हरिश्चंद्र’ या मूकपटातून कलाविश्वात पाऊल ठेवलं.‘रामायण’ मालिकेत ‘मंथरे’चं पात्र अभिनेत्री ललिता पवार यांनी साकारलं होतं. 5 / 8 १९३५ साली प्रदर्शित झालेल्या ‘हिम्मत-ए-मर्दा’ या चित्रपटाद्वारे त्यांनी सिनेविश्वात पदार्पण केलं. या चित्रपटाचं चांगलंच कौतुक झालं. 6 / 8दिग्दर्शक गणपतराव पवार यांच्याबरोबर ललिता यांचा पहिला विवाह झाला. त्यानंतर त्यांनी एकत्र सात-आठ चित्रपटही केलं होतं. मात्र दुर्दैवाने हा विवाह फार काळ टिकला नाही. त्यानंतर त्यांनी राजा गुप्ता यांच्यासोबल लग्नगाठ बांधली.7 / 8अखेरच्या दिवसांत ललिता पवार कर्करोगाने त्रस्त होत्या. शेवटच्या घटका मोजताना त्या घरी एकट्याच होत्या. मृत्यूच्या तीन दिवसानंतर त्यांचा मृतदेह राहत्या घरी सापडला होता. 8 / 8ललिता पवार यांना १९६१ साली ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’, १९७७ साली ‘महाराष्ट्र राज्य पुरस्करा’ने गौरविण्यात आलं.