Join us
Daily Top 2Weekly Top 5

२८ वर्षांनी मोठ्या दिग्दर्शकावर भाळली अन् पश्चाताप झाला; पैशांसाठी 'तिला' लुबाडलं, बॉलिवूडच्या 'कॅब्रे क्विन'ची अज्ञात बाजू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 15:30 IST

1 / 8
मोनिका... ओ माय डार्लिंग..'' या गाण्याचे बोलही जरी कानावर आले तरी डोळ्यांसमोर उभी राहते ती एक देखणी, बोल्ड आणि आर्ततेने, विजेच्या गतीने नाचणारी अभिनेत्री हेलन.
2 / 8
एकेकाळी आपल्या नृत्याने आणि सौंदर्याने भल्याभल्यांना वेड लावणाऱ्या या अभिनेत्रीचा डान्स पाहायला प्रेक्षक अक्षरशः गर्दी करत असत.
3 / 8
२१ नोव्हेंबर १९३८ रोजी म्यानमार बर्मामध्ये त्यांचा जन्म झाला. मात्र, त्यांचं बालपण अतिशय संघर्षमय होतं. वडिलांच्या मृत्यूनंतर हेलन यांच्या आईने एका ब्रिटिश सैनिकाशी लग्न केले. पण दुसऱ्या महायुद्धात त्यांचाही मृत्यू झाला.
4 / 8
दरम्यान, हेलन यांनी अमर प्रेम या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. मात्र,फारशा चांगल्या भूमिका त्यांच्या वाट्याला आल्या नाहीत.
5 / 8
पण, पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांनी नृत्य चालुच ठेवलं. त्यांचं नृत्य कौशल्य पाहून अनेक दिग्दर्शकांनी त्यांना चित्रपट ऑफर केले.
6 / 8
बॉलिवूडमधील कॅबरे गाणी आणि खलनायिकांच्या भूमिकांसाठी हेलन यांनी लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत आपलं स्थान पक्कं केलं. 'मिलन' , 'सितमगर', 'यहूदी', 'अनाडी', 'बाजीगर', 'बेदर्द जमाना क्या जाने','हीरा मोती', 'कंगन', डॉन, या चित्रपटांमुळे त्यांची कारकिर्द आणखी बहरत गेली.
7 / 8
हेलन आपल्या अभिनय कारकि‍र्दीपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळेही तितक्याच चर्चेत राहिल्या.आपल्यापेक्षा २८ वर्षांनी मोठे दिग्दर्शक पीएन अरोरा यांच्यासोबत लग्न केलं होत,पण त्यांचा घटस्फोट झाला. आर्थिक फसवणूक झाल्याने त्यांनी हा निर्णय घेतला.
8 / 8
एका चित्रपटाच्या सेटवर त्यांची भेट सलीम खान यांच्यासोबत झाली. पहिलं लग्न झालं असूनही हेलन यांनी सलीम खान यांच्याशी १९८१ मध्ये दुसरं लग्न केलं.हेलन आणि सलीम खान यांनी अर्पिता खान ही मुलगी दत्तक घेतली आहे.
टॅग्स :हेलनबॉलिवूडसेलिब्रिटी