लग्नाची गोष्ट! एका कुत्र्यामुळे मोडला बॉलिवूड अभिनेत्याचा संसार, विश्वास नाही बसणार पण हे खरंय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 12:32 IST
1 / 10'पति, पत्नी और वो' हे तर सगळ्यांनीच ऐकलं, पण 'पती, पत्नी आणि कुत्रा' हे पहिल्यांदाच ऐकत असाल. 2 / 10पण, तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे की एका बॉलिवूड अभिनेत्याचा कुत्र्यामुळे ( Divorce Due To Pet Dogs) घटस्फोट झाला. अनेकदा घटस्फोट घेण्याची वेगवेगळी कारणे असतात. विवाहबाह्य संबंध, वेगवेगळ्या आवडीनिवडी किंवा कोणत्या भांडणांमुळे घटस्फोट झाल्याचं पाहायला मिळतं. पण, कुत्र्यामुळं घटस्फोट झाल्याचं ऐकून चाहतेही थक्क झालेत.3 / 10बॉलिवूडचा हा लोकप्रिय अभिनेता मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अर्जुन सिंग यांचा नातू आहे. या अभिनेत्याचे वडीलही पाच वेळा आमदार राहिलेत. 4 / 10तो अभिनेता आहे अरुणोदय सिंह (Arunoday Singh). बड्या राजकीय कुटुंबातून आलेल्या अरुणोदयने कुटुंबाप्रमाणे राजकारणात करिअर न करता सिनेसृष्टीत एन्ट्री केली. आधी सिनेमांमधून आणि नंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन जगभरात लोकप्रियता मिळवली. 5 / 10अरुणोदयला करिअरमध्ये यश तर मिळालं. पण, त्याचा संसार काही टिकला नाही. अभिनेत्याचं कुत्र्यावरील प्रेम संसारावर भारी पडलं.6 / 10अरुणोदय गोव्याच्या प्रवासादरम्यान कॅनेडियन ली एल्टनला भेटला आणि तिथेच तिच्या प्रेमात आकंठ बुडाला. दोघांनी जवळजवळ तीन वर्ष एकमेकांना डेट केलं.7 / 10अरुणोदय आणि ली एल्टन यांचा २०१६ मध्ये मोठ्या थाटामाटात विवाह (Arunoday Singh Married Leeann Elton) पार पडला, ज्यामध्ये अरुणोदय याचं संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं. या लग्नसमारंभात सेलिब्रिटींसोबतच अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. 8 / 10ली एल्टन, जी एक योगा प्रशिक्षक होती, या दोघांचं लग्न झालं. सुरुवातीला सर्व काही ठीक होतं, पण लवकरच त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. या दुराव्याचं कारण कोणताही विवाहबाह्य संबंध किंवा तिसरी व्यक्ती नव्हती, तर चक्क अरुणोदयचे पाळीव कुत्रे होते.9 / 10 कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे आणि त्यांच्या भांडण्यामुळे ली एल्टनला त्रास होऊ लागला. रोजच्या वादांमुळे हळूहळू दोघांमधील नात्यात कटुता निर्माण झाली आणि गोष्टी हाताबाहेर गेल्या. दोघांनीही हे नातं वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण जेव्हा काहीच तोडगा निघत नव्हता, तेव्हा त्यांनी २०१९ मध्ये घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. 10 / 10सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, अरुणोदयने आपल्या लाडक्या कुत्र्यांना स्वतःपासून दूर करण्याऐवजी पत्नीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला.