Join us

मकरंद देशपांडेच्या मेव्हणीचं बोल्ड फोटोशूट चर्चेत, अभिनेत्रीच्या फोटोंवरून हटणार नाही तुमची नजर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 15:36 IST

1 / 10
हिंदी आणि मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता मकरंद देशपांडे (Makrand Deshpande) यांची मेव्हणी प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
2 / 10
मराठी आणि हिंदी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता मकरंद देशपांडे (Makrand Deshpande)च्या पत्नीचं नाव निवेदिता पोहनकर (Nivedita Pohankar) आहे. तिच्या बहिणीचं नाव अदिती पोहनकर (Aditi Pohankar) असून ती प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
3 / 10
अदिती पोहनकरने आश्रम या वेबसीरिजमध्ये बॉबी देओलसोबत काम केले आहे. यात तिने पहेलवान पम्मीची भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती. नुकताच या सीरिजचा तिसरा सीझन भेटीला आला आहे.
4 / 10
तसेच नुकतेच तिच्या शी या वेबसीरिजचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सीरिजचं दिग्दर्शन इम्तियाज अलीने केले आहे.
5 / 10
अदिती पोहनकर सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. ती सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. बऱ्याचदा तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.
6 / 10
अभिनेत्री खऱ्या आयुष्यात खूपच बोल्ड आहे.
7 / 10
अदितीने आपल्या करिअरची सुरुवात रंगभूमीपासून केली होती. सुरुवातीला ती देखील पृथ्वी थिएटर्सशी जोडली गेली होती. लव्ह सेक्स और धोका या हिंदी चित्रपटातून अदिती पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर झळकली.
8 / 10
हिंदी चित्रपटातून प्रसिद्धी मिळवल्यानंतर अदितीने कुणासाठी कुणीतरी या चित्रपटातून मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले.
9 / 10
अदिती पोहनकर रितेश देशमुखसह 'लयभारी' या चित्रपटात झळकली होती. अदितीने या चित्रपटातील भूमिकेचे खूप कौतुकही झाले होते.
10 / 10
या चित्रपटानंतर अदितीने ‘ट्रकभर स्वप्नं’ या चित्रपटातून मराठी पडद्यावर कमबॅक केले. यात मकरंद देशपांडेदेखील प्रमुख भूमिकेत होते.