Join us

'अ‍ॅनिमल'मधील बॉबी देओलची तिसरी पत्नी खऱ्या आयुष्यात आहे खूपच ग्लॅमरस, 'पठाण'मध्येही केलंय काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 15:08 IST

1 / 7
'अ‍ॅनिमल'मधील बॉबी देओलच्या भूमिकेने लाखो लोकांची मने जिंकली आहेत. कोणत्याही संवादाशिवाय त्याने एका डेंजरस खलनायकाची भूमिका चोख बजावली आहे. चित्रपटात बॉबी देओलने साकारलेल्या पात्राचे नाव अबरार हक असून त्याने तीन लग्न केले आहेत.
2 / 7
'अ‍ॅनिमल' चित्रपटात अबरार हक तिसऱ्यांदा लग्न करताना दाखवण्यात आला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, ती मुलगी कोण आहे जिने बॉबी देओलसोबत तिसऱ्यांदा लग्न केले?
3 / 7
'अ‍ॅनिमल'मध्ये बॉबी देओलसोबत तिसऱ्यांदा लग्न करणाऱ्या मुलीचे नाव मानसी तक्षक आहे. मानसी तक्षक 'अ‍ॅनिमल'च्या आधी शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटातही दिसली होती. या चित्रपटात तिने जिमच्या पत्नीची भूमिका साकारली होती.
4 / 7
पठाणमध्ये जॉन अब्राहमने जिमची भूमिका साकारली होती. मानसी तक्षक सौंदर्यात अनेक अभिनेत्रींना मागे टाकते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि खास पोस्ट शेअर करत असते.
5 / 7
मानसी तक्षक बद्दल बोलायचे तर ती फक्त २५ वर्षांची आहे. त्यांचा जन्म १९९८ साली मुंबईत झाला. तिचे शालेय शिक्षण गुजरातमधून केले. त्यानंतर तिने मुंबईच्या भावना कॉलेजमधून मास मीडियामध्ये ग्रॅज्युएशन केले.
6 / 7
मानसी तक्षक हिने २०१९ मध्ये फेमिना मिस इंडिया सौंदर्य स्पर्धेतही भाग घेतला होता. जिथे तिने मिस इंडिया गुजरातचा किताब जिंकला. यानंतर मानसी तक्षक अनेक सौंदर्य स्पर्धांचा भाग बनली. ती अनेक जाहिरातींमध्ये दिसली आहे.
7 / 7
मानसी तक्षकाने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात आय प्रॉमिस या लघुपटातून केली. हा चित्रपट २०२२ मध्ये आला होता. यात तिने हिनाची भूमिका साकारली होती. ही शॉर्ट फिल्म यूट्यूबवरही उपलब्ध आहे.
टॅग्स :रणबीर कपूरबॉबी देओल