जर तुम्हाला आठवत असेल तर गेल्यावर्षी लीजाने खूपच हॉट फोटोशूट केले होते. जेव्हा तिचे हे फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले होते तेव्हा नेटिझन्समध्ये एकच चर्चा रंगली होती. या फोटोमध्ये ती अभिनेता हृतिक रोशन याच्याबरोबर बघावयास मिळाली होती. दोघांच्या या फोटोंनी इंटरनेटवर आग लावली होती. कारण काहीच दिवसांमध्ये हृतिक आणि लीजाचे हे फोटो त्यांच्या चाहत्यांच्या मोबाइल गॅलरीत सेव्ह झाले होते. या फोटोंवरून असाही अंदाज बांधला जात होता की, लवकरच हे दोघे एखाद्या चित्रपटात झळकतील. परंतु अद्यापपर्यंत तशी कुठलीही बातमी समोर आली नाही. असो आज तिच्या वाढदिवसानिमित्त हेच फोटो आम्ही पुन्हा एकदा त्यांच्या चाहत्यांना दाखविणार आहोत.
जर लीजा हेडन हिच्याविषयी सांगायचे झाल्यास तिने कोट्यवधी लोकांची मने तोडत बॉयफ्रेंड डीनो लालवाणी याच्याशी गेल्या आॅक्टोबर महिन्यात लग्न केले होते. काही दिवसांपूर्वीच तिने एका गोंडस मुलाला जन्मही दिला. लीजा वेळोवेळी तिच्या चिमुकल्याचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करीत असते. तिच्या चाहत्यांकडून यास चांगला रिस्पॉँसही मिळत असतो.