जन्मगाव : पाटणा
९ डिसेंबर १९४५ रोजी बिहारमधील पाटणा शहरात त्यांचा जन्म झाला.
तीन भाऊ
त्यांना तीन भाऊ. शत्रुघ्न हे सर्वांत लहान. राम, लक्ष्मण आणि भरत ही त्यांच्या भावांची नावे. शत्रुघ्न यांना दोन मुले लव आणि कुश तसेच मुलगी सोनाक्षी. त्यांच्या घराचे नावही ‘रामायण’ असे आहे.
डेब्यू :प्रेम पुजारी
देव आनंदच्या ‘प्रेम पुजारी’ या चित्रपटापासून शत्रुघ्न सिन्हा यांनी प्रथम अभिनय केला.
शॉटगन फॅमिली : पत्नी पूनम सिंग व तीन मुले सोनाक्षी, लव आणि कुश समवेत शत्रुघ्न सिन्हा
लॉस्ट चान्स
शोले चित्रपटात जयची भूमिका करण्यासाठी अमिताभ बच्चन यांच्याअगोदर शत्रुघ्न सिन्हा यांना विचारणा करण्यात आली होती.
शिक्षण : एफटीआयआय
शत्रुघ्न सिन्हा यांनी पुण्याच्या एफटीआयआयमध्ये प्रशिक्षण घेतले. डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना त्यांना नावाने स्कॉलरशीप दिली जाते.
बडे दिल वाला
‘कालिचरण’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर केवळ २४ तासात कर्मचाऱ्यांना महिन्याचा बोनस देणार असल्याची घोेषणा त्यांनी केली होती.
मिस इंडिया वाईफ : शत्रुघ्न सिन्हा आणि पत्नी पूनम सिंग
प्रेम अफवा
शत्रुघ्न सिन्हा आणि रिना रॉय यांची जोडी खूप गाजली. त्यावेळी हे दोघे जण लग्न करणार असल्याच्याही अफवा होत्या.
डिअर वाईफ
शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी पूनम सिंग या माजी मिस इंडिया (१९६८) आहेत. त्यांनी ‘शॉटगन मुव्हीज’ या नावाने फिल्म प्रॉडक्शनला सुरुवात केली.
सर्वात मोठी चूक
१९९१ साली राजेश खन्ना यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. ‘ राजेश खन्ना विरोधात निवडणूक लढवणे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. त्यासाठी मी त्यांची माफीदेखील मागितली, असे त्यांनी आपल्या ‘एनिथिंग बट खामोश’ या आत्मचरित्रात लिहिले आहे.
शॉटगन : शत्रुघ्न सिन्हा
राजकीय कारकीर्द
२००९ साली ते पाटणासाहिब मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण त्याशिवाय जहाजबांधणी मंत्री म्हणूनही त्यांनी काम केले.