बॉलिवूडमधील प्रसिद्ध कपूर परिवारात करिष्माचा जन्म झाला. विशेष म्हणजे या परिवाराचे सर्वात मोठे वैशिष्ट्ये म्हणजे घरातील सर्वच सदस्य इंडस्ट्रीमध्ये सुपरस्टार राहिले आहेत. करिष्माचे वडील रणधीर कपूर, आई बबिता, आजोबा राज कपूर यांचे बॉलिवूडमध्ये प्रचंड योगदान राहिले आहे. करिष्मा आणि तिची लहान बहीण करिना यांनीदेखील परिवाराचा वारसा तेवढ्याच खुबीने पुढे नेला, नेत आहेत. जेव्हा करिष्मा बॉलिवूडमध्ये काम करीत होती, तेव्हा तिच्या जलव्यांची सर्वत्र चर्चा रंगत असे. त्यामुळेच करिष्मा आज जरी इंडस्ट्रीत नसली तरी, तिच्या नावाचा डंका आजही वाजतोय हे निश्चित...
करिष्माच्या वैवाहिक जीवनाविषयी सांगायचे झाल्यास, तिचा विवाह व्यावसायिक संजय कपूर याच्याशी झाला होता. मात्र हा विवाह फार काळ टिकला नाही. काही दिवसांपूर्वीच दोघांमध्ये घटस्फोट झाला. करिष्माला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. करिष्माने तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात १९९१ मध्ये ‘प्रेम कैदी’ या चित्रपटातून केली. मात्र हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर सुपर फ्लॉप ठरला. मात्र त्यानंतर तिने एका पाठोपाठ एक सुपरहिट चित्रपट दिले.
‘फिजा, बीवी नंबर १, जुडवा, राजा बाबू, दिल तो पागल है, राजा हिंदुस्तानी, साजन चले ससुराल, सपने साजन के’ आदी सुपरहिट चित्रपटांमध्ये करिष्मा मुख्य भूमिकेत झळकली. सध्या ती संदीप तोष्णीवाल याला डेट करीत असून, लवकरच त्याच्याशी विवाह करण्याची शक्यता आहे. सध्या हे दोघे लिव इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचीही चर्चा आहे. बºयाचशा इव्हेंट आणि पार्ट्यांमध्ये हे दोघे एकत्र दिसतात. संदीपने तर करिष्मामुळेच त्याच्या पत्नीला घटस्फोट दिला आहे.