Join us

​Birthday Special : लहानपणी ‘या’ आजाराने पीडित होता अभिषेक बच्चन, आमिर खानमुळे झाला होता खुलासा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2018 11:21 IST

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन याचा आज (५  फेब्रुवारी) वाढदिवस. ५ फेब्रुवारी १९७६ रोजी जन्मलेल्या अभिषेकने आत्तापर्यंत पन्नासावर चित्रपटांत काम ...

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन याचा आज (५  फेब्रुवारी) वाढदिवस. ५ फेब्रुवारी १९७६ रोजी जन्मलेल्या अभिषेकने आत्तापर्यंत पन्नासावर चित्रपटांत काम केले आहे. महानायक अमिताभ बच्चन आणि ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांच्या पोटी जन्मलेल्या अभिषेकने सन २००० मध्ये आपल्या फिल्मी करिअरची सुरूवात केली. ‘रिफ्युजी’ हा अभिषेकचा पहिला चित्रपट.  हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर फार कमाल दाखवू शकला नाही, पण यातील त्याच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते.अभिषेक लहानपणी एका आजाराने पीडित होता. अभिनेता आमिर खान याच्यामुळे अभिषेकच्या या आजाराचा खुलासा झाला होता. होय, आमिरने २००७ मध्ये ‘तारे जमीन पर’ हा चित्रपट बनवला तेव्हा त्याने अभिषेकबद्दल खुलासा केला होता. होय, अभिषेक बच्चन लहानपणी डिस्लेक्सिया (dyslexia) या आजाराने पीडित होता. आमिरचा ‘तारे जमीन पर’ याच आजारावर आधारित होता.तुम्हाला माहित नसेल की, अभिषेकला अ‍ॅक्टिंगमध्ये नाही तर बिझनेसमध्ये करिअर करायचे होते. युएसएच्या बोस्टन युनिव्हर्सिटीत त्याने संबंधित एका अभ्यासक्रमाला प्रवेशही घेतला होता. पण अचानक त्याला चित्रपटाचा प्रस्ताव आला आणि त्याने हा अभ्यासक्रम अर्धवट सोडून अ‍ॅक्टिंग करण्याचा निर्णय घेतला. पिता अमिताभ यांनी अभिषेकच्या या निर्णयाला पाठींबा दिला.अभिषेकच्या करिअरमधील पहिला हिट सिनेमा ‘धूम’ होता. यापूर्वीचे त्याचे सगळे चित्रपट आलेत तसे आपटले. २००५ मध्ये आलेल्या ‘ब्लफमास्टर’ या चित्रपटात अभिषेकने गाणेही गायले होते. हे गाणे चांगलेच लोकप्रीय झाले होते. या चित्रपटात अभिषेक व प्रियांका चोप्रा लीड रोलमध्ये होते.ऐश्वर्या राय ही अभिषेकची पत्नी आहे. पण त्याआधी अभिषेकचा करिश्मा कपूरसोबत साखरपुडा झाला होता. अभिषेकच्या पहिल्या चित्रपटात करिश्माची लहान बहीण करिना हिरोईन होती. करिना अभिषेकला जीजू म्हणूनच हाक मारायची. अमिताभ यांनी आपल्या ६० व्या वाढदिवशी करिश्मा व अभिषेक यांच्या साखरपुड्याची घोषणा केली आणि सगळ्या जगापुढे या नात्याचा खुलासा झाला. पण यानंतर असे काही  झाले की, हे लग्न मोडले. करिश्माची आई बबीता हिला अभिषेक फारसा आवडत नव्हता. या काळात अभिषेकचे सगळे चित्रपट फ्लॉप गेलेत. याऊलट करिश्मा त्याकाळातील सुपरहिट हिरोईन होती. अभिषेक अपयशी ठरला तर काय, याची बबीता यांना भीती होती. आईच्या या भीतीपोटी करिश्मा मागे हटली व तिने हा साखरपुडा तोडला, असे म्हटले जाते.करिश्मासोबत साखरपुडा तुटल्यानंतर अभिषेकचे मन राणी मुखर्जीवर आले. मणिरत्नम यांच्या ‘युवा’ या चित्रपटादरम्यान दोघांमधील जवळीक वाढली. दोघांचीही आॅन आणि आॅफ केमिस्ट्री लोकांना चांगलीच भावली. पण यावेळी अभिषेकची आई जया बच्चन यांनी राणीला विरोध केला. आईने अभिषेकला राणीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आणि त्याचमुळे राणी बच्चन कुटुंबाची सून बनता बनता राहिली.ALSO READ : पतीच्या ‘या’ एक्स गर्लफ्रेंडसोबत पहिल्यांदाच झाला ऐश्वर्या राय-बच्चनचा आमना-सामना!यानंतर अभिषेकच्या आयुष्यात ऐश्वर्या आली. अभिषेक व ऐश्वर्याने बरेच चित्रपट एकत्र केले होते. पण त्याकाळात ऐश्वर्याच्या आयुष्यात सलमान खान आणि नंतर विवेक ओबरॉय होते. पण या दोघांशीही ऐश्वर्याचे ब्रेकअप झाले. यानंतर ‘गुरु’ या चित्रपटाच्या सेटवर अभिषेक आणि ऐश्वर्या जवळ आलेत. ‘गुरु’च्या सक्सेस पार्टीदरम्यान अभिषेकने ऐश्वर्याला प्रपोज केले. यानंतर एप्रिल २००७ मध्ये दोघांचे लग्न झाले.