Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुशांत सिंग रजपूतच्या निधनानंतर अनेक महिन्यांनी अंकिता लोखंडेने या गोष्टीची दिली होती कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 06:00 IST

1 / 7
2016 मध्ये अंकिता लोखंडे व सुशांत सिंग रजपूतचे ब्रेकअप झाले होते. पण या ब्रेकअपमागचे कारण कोणालाही ठाऊक नव्हते. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 7
सुशांतच्या निधनानंतर अनेक महिन्यांनी अंकिताने एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 7
तिने एका मुलाखतीत सांगितले होते की, मी इथे कोणावर आरोप करत नाहीये. पण माझी कहाणी कोणालाच ठाऊक नाही. सुशांतला काय हवे होते, हे त्याने पक्के ठरवले होते. त्याला करिअरमध्ये पुढे जायचे होते आणि म्हणून माझ्याऐवजी त्याने करिअर निवडले आणि पुढे गेला. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 7
तिने पुढे सांगितले होते की, त्यानंतर अडीच वर्षे मी काय काय सहन केले, हे मलाच ठाऊक़ मी बेडवर नुसते पडून असायचे. मी आता काय करू? आत्महत्या करू का? असे प्रश्न सतत डोक्यात सुरु राहायचे. लोक येऊन मला सुशांतसोबतचे फोटो डिलीट करायला, घरातून हटवायला सांगायचे. पण मला वेळ द्या, यातून बाहेर पडण्यासाठी मला थोडा वेळ हवाये, असे मी त्यांना सांगायचे. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 7
मी त्याची खूप वाट पाहिली... पण तो परतला नाही. मी त्याला दोष देत नाहीये. त्याने त्याचा मार्ग निवडला, मग मी काय करायला हवे होते? असे देखील तिने एका मुलाखतीत सांगितले होते. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 7
अंकिता आणि सुशांत यांची ओळख पवित्र रिश्ता या मालिकेच्या सेटवर झाली होती. याच मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. (फोटो: इंस्टाग्राम)
7 / 7
अंकिता आणि सुशांत यांचे कपल त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडत असे. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :अंकिता लोखंडेसुशांत सिंग रजपूत