हळदीचा विधी :
लग्नाकार्यात हळदीचा विधी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. नवरदेव-नवरीला जोपर्यंत हळद लागत नाही तोपर्यंत नवरदेव नवरी वाटतच नाहीत. युवराजला हळद लावण्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली होती. त्याचे मित्रमंडळ, नातेवाईक आल्यानंतर हा विधी राहिला नाही तर संपूर्ण सेलिब्रेशनच झालं. या विधीवेळचा युवराजला हळद लागतानांचा एक फोटो :
मेहंदी रची हैं हाथों में :
हातावर मेहंदी लागेपर्यंत नवरी नसते असा समज आपल्याकडे आहे. युवराजची पत्नी होण्यासाठी आतुर असलेल्या हेजल कीचला खास पंजाबी स्टाईलची मेहंदी लावण्यात आली होती. ती मेहंदी एवढी सुरेख होती की स्वत: युवराजही त्या मेहंदीवर आणि हेजलवर फिदा झाला. हे पाहा :
दुल्हेराजाचे आगमन :
नवरदेव केव्हा येणार? अशी हुरहूर लग्नाच्या ठिकाणी उपस्थित सर्वांनाच लागलेली असते. युवराजच्या लग्नाचीही तीच खासियत होती. सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असतांना युवीची एन्ट्री झाली. पंजाबी मुंडा युवी पारंपारिक पंजाबी वेशभूषेत गुरूद्वारा येथे आला. त्यावेळी त्याच्यासोबत मित्रमंडळी, नातेवाईक ही वऱ्हाडी मंडळीही आली.
लग्नाचा पारंपारिक सोहळा :
लग्न म्हटल्यावर सर्वकाही आपल्या जुन्या प्रथा, परंपरेनुसारच होत असते. लाल रंगाचा कुर्ता पायजमा आणि लाल रंगाचा घागरा घालून वधूवरांनी विधी पूर्ण केले. थोरामोठ्यांच्या आशीर्वादात आणि प्रार्थनेत लग्नाचा विधी पार पडला. यावेळी युवी आणि हेजल हे खऱ्या अर्थाने पती-पत्नी झाले. दोघांच्याही चेहऱ्यावरील आनंद यावेळी ओसंडून वाहत होता.