यावेळी आराध्याने कलरफुल फ्रॉक घातला होता. अमिताभ यांपी आराध्याला कडेवर घेत चाहत्यांना अभिवादन केले. या क्षणांचे फोटो खरोखरचं सुंदर आहेत. अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगमध्येही याचा उल्लेख केला आहे. त्यांनी लिहिलेय की, आराध्या सुरुवातीला इतक्या मोठ्या गर्दीला पाहून घाबरली होती. पण नंतर ती सहजपणे वावरली. अर्थात तिचे लक्ष त्या गर्दीपेक्षा एका मांजरीवर होते. ती मांजर तिला पाळायची होती. या मांजरीसोबत खेळतानाचा आराध्याचा एक क्यूट फोटोही त्यांनी शेअर केला आहे.
सोबत ऐश्वर्या, आराध्यासोबतचा एक फोटोही आहे. यात नात आणि सूनेसोबत रमलेले अमिताभ पाहणे चाहत्यांसाठी निश्चितपणे आनंददायी आहे. यापूर्वी गत १५ मे रोजी अमिताभ चाहत्यांना भेटले होते. यावेळी ते चाहत्यांसमक्ष मुलगी श्वेता बच्चन हिला पोझ देताना दिसले होते.
अमिताभ बच्चन सध्या ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’मध्ये बिझी आहेत. या चित्रपटात अमिताभ बच्चन व आमिर खान ही जोडी प्रथमच एकत्र येणार आहे.